लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत सुमारे दीड लाख नवीन मतदार नव्याने वाढले आहेत. वर्षाकाठी ५० हजार नवमतदारांची भर पडत असून, आणखी दोन वर्षांत होणाºया नोंदणी कार्यक्रमात सुमारे सव्वालाख मतदार नव्याने नोंदणी करण्याची शक्यता आहे.मतदार नोंदणी वर्षभर चालू ठेवण्यात आली, फक्त यादी अपडेट करण्याचे काम दरवर्षी जानेवारी अखेरपर्यंत हाती घेण्यात येते. त्यामुळे नवीन नोंदणी करणाºयांना आॅफलाइन व आॅनलाइन नोंदणी करणे सोपे झाले आहे.२०१४ साली जिल्ह्यात २४ लाख ८८ हजार ३७० मतदार होते. १ जानेवारी २०१७ रोजी २५ लाख ९५ हजार ६६ मतदारांची नोंदणी झाल्याचे समोर आले. आॅक्टोबर २०१७ पर्यंत २६ लाख ३६ हजार ३५४ मतदारांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात सिल्लोड मतदारसंघ नोंदणीत आघाडीवर आहे, तर शहरात पश्चिम मतदारसंघात तीन वर्षांत २२ हजार ३९२ मतदार वाढले आहेत. ३ लाख ९ हजार ८५९ मतदारसंख्या पश्चिममध्ये आहे. पूर्व मतदारसंघात १३ हजार ७०८ मतदार वाढले असून, २ लाख ७५ हजार ४६३ मतदार सध्या आहेत. मध्य मतदारसंघात ८ हजार १३२ मतदार वाढले असून, २ लाख ९४ हजार ८१७ मतदार सध्या आहेत.स्थलांतरित मतदारांसाठी सॉफ्टवेअरस्थलांतरित मतदारांसाठी आॅक्टोबरपासून संपूर्ण देशभर कनेक्टिव्हिटी असलेले सॉफ्टवेअर जिल्हा निवडणूक विभागाशी जोडण्यात आले आहे.मतदार स्थलांतरित झाल्यास आणि नव्याने नोंदणी करण्यासाठी अर्ज केला, तर त्याची पूर्वीची नोंदणी रद्द करण्यासाठी नवीन विधानसभा क्षेत्रात सूचना देण्यात येते.त्यासाठी विशिष्ट कालावधी देण्यात येतो. एकाच व्यक्तीची देशभरात कुठेही मतदार यादीत द्विनोंद यापुढे राहणार नाही. असे उपनिवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.२०१४ साली २४ लाख ८८ हजार ३७०, जानेवारी २०१७ मध्ये २५ लाख ९५ हजार ६६, तर आॅक्टोबर २०१७ मध्ये २६ लाख ३६ हजार ३५४ पर्यंत मतदार नोंदणी वाढली.मतदारसंघ नाव मतदारव क्रमांकसिल्लोड १०४ २,९९,९३३कन्नड १०५ ३,००,४२१फुलंब्री १०६ ३,०२,८२३औरंगाबाद मध्य १०७ २,९४,८१७औरंगाबाद पश्चिम १०८ ३,०९,८५९औरंगाबाद पूर्व १०९ २,७५,४६३पैठण ११० २,७८,८६३गंगापूर १११ २,८५,८००वैजापूर ११२ २,८८,३५६एकूण मतदार २६,३६,३५४
औरंगाबाद जिल्ह्यात ३ वर्षांत वाढले दीड लाख मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:22 AM