शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

औरंगाबाद जिल्ह्यात २० टक्के पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:59 AM

जायकवाडी धरण भरल्याचे  समाधान

ठळक मुद्दे५ तालुक्यांत कमी पाऊस सरासरी गाठण्यासाठी १३१.४३ मि.मी. पावसाची अपेक्षा 

औरंगाबाद : जिल्ह्यात २४ सप्टेंबर अखेरपर्यंत ८०.५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५४४.०३ मि.मी. पाऊस झाला असून, २० टक्के पाऊस झाल्यास जिल्ह्याची सरासरी यंदा पूर्ण होणार आहे. सध्या सुरू असलेला पाऊस हा परतीचा पाऊस असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६७५.४६ मि.मी. इतकी आहे. १३१.४३ मि.मी. पावसाची सध्या तूट आहे. 

- सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. सिल्लोडमध्ये १०६.३३ टक्के, सोयगावमध्ये १०५.०९ टक्के पावसाची २४ सप्टेंबरपर्यंत झाली आहे. - वैजापूरमध्ये ९६.७९ टक्के, तर फुलंब्रीमध्ये ८९.११ टक्के पाऊस  झाला आहे. १०० टक्के पावसाची सरासरी पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर हे दोन तालुके आहेत. - औरंगाबाद तालुक्यात ६७.८४ टक्के, पैठण तालुका ६४.३७ टक्के, कन्नड तालुक्यात ८१.१५ टक्के, गंगापूर तालुक्यात ६७.०२ टक्के, खुलताबादमध्ये ५२.३३ टक्के पाऊस आजवर झाला आहे. - खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यात कमी पाऊस झालेला आहे. पैठण तालुक्यात देखील दमदार पावसाची अपेक्षा आहे. - जायकवाडी धरण भरले असले तरी पैठण तालुक्यात ६४.३७ टक्केच पाऊस तालुक्यात झालेला आहे. सिल्लोड व सोयगावमध्ये ८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात २४ सप्टेंबरपर्यंत ५९२.०८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. आजवर ५४४.०३ मि.मी. पाऊस झाला आहे.४८.२३ मि.मी. पावसाची तूट सध्या आहे. मागील वर्षी आजवर ४४९ मि.मी. पाऊस झाला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बºयापैकी पाऊस झाल्याचे दिसते.

जायकवाडी धरण भरल्याचे  समाधानजायकवाडी हे जिल्ह्यातील मोठे धरण आहे. ते यंदा नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे पूर्णक्षमतेने भरले आहे. सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांना पुरेसे पाणी आले आहे. वैजापूरमधील प्रकल्पांत पाणी आहे. गंगापूरमधील पाटबंधारे प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. ९० लघु आणि १६ मध्यम प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. यातील ५० टक्के प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.

तालुके     झालेला पाऊसऔरंगाबाद               ६७.८४ मि.मी.फुलंब्री                  ८९.११ मि.मी. पैठण               ६४.३७ मि.मी. सिल्लोड             १०५.७० मि.मी. सोयगाव               १०६.०० मि.मी.कन्नड                ८१.१५ मि.मी. वैजापूर                ९६.७९ मि.मी. गंगापूर               ६७.०२ मि.मी. खुलताबाद               ५२.३३ मि.मी.एकूण             ५४४.०३ मि.मी.  

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र