औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ८४.०४ टक्के, तर मुलांचा ७१.७५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.२९ असून, विभागात दुसरे स्थान मिळाले आहे.शिक्षण मंडळाने १ मार्च ते २२ मार्चदरम्यान घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर केला. यावर्षी राज्यपातळीवरच निकालाची मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्याचे पडसाद औरंगाबाद जिल्ह्यातही उमटले. जिल्ह्यातून ६५ हजार ७५० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५० हजार ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात २५ हजार ५७२ मुलांचा आणि २४ हजार ४७९ मुलींचा समावेश आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून ३५ हजार ६४० मुले बसली होती, तर २९ हजार १२१ मुलींनी परीक्षा दिली. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १२. ३१ टक्के अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.१३ हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीतऔरंगाबाद जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी मिळवली आहे, तर प्रथम श्रेणीत २१ हजार १४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ४५ ते ५९ टक्के घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ हजार ५१० आहे. ३५ ते ४४ टक्क्यांदरम्यान गुण घेणाºया विद्यार्थ्यांचा आकडा १,९६९ एवढा आहे.सोमवारपासून गुणपडताळणी प्रक्रियादहावीच्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे. त्यांनी गुणपडताळणी अर्ज विहित नमुन्यात सोमवारी (दि.१०) ते १९ जूनपर्यंत संबंधित शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे करावेत. त्या अर्जासोबत संकेतस्थळावरील गुणपत्रिकेची छायाप्रत जोडावी लागेल, तसेच उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत देण्याची सुविधाही सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिविषयाच्या उत्तरपत्रिकेला ४०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येईल,अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.चित्रकलेचे ३ हजार ४१९ विद्यार्थ्यांना गुणमंडळातर्फे कलास्वाद, स्काऊट गाईड, एनसीसी, वाहतूक सुरक्षा, आरोग्य व शारीरिक शिक्षण, अशा विविध प्रकारांत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखविणाºया विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतात. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३ हजार ४१९ विद्यार्थ्यांना चित्रकला प्रकारात गुण देण्यात आले. एसीसीमध्ये १ आणि क्रीडामध्ये ४२४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:03 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ८४.०४ टक्के, तर मुलांचा ७१.७५ टक्के निकाल लागला. जिल्ह्याच्या एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७७.२९ असून, विभागात दुसरे स्थान मिळाले आहे.
ठळक मुद्देविभागात मिळाले दुसरे स्थान : मुलींचा निकाल ८४. ०६ टक्के लागला