औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यात औरंगाबाद जिल्ह्याला ऑक्टोबरमध्ये मोठा दिलासा मिळाला. सप्टेंबरमध्ये तब्बल १० हजार १८८ नव्या रुग्णांची वाढ झाली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये केवळ ४ हजार ४९३ रुग्णांची भर पडली. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ५६ टक्के रुग्ण कमी राहिले.
जिल्ह्यात कोरोनाने सप्टेंबरमध्ये रौद्ररूप धारण केले होते. रोज ३०० ते ४०० च्या घरात रुग्णांचे निदान होत गेले. या महिन्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या ६ हजारांवर गेली होती. परिणामी, खाटा, आयसीयू खाटांसाठी रुग्णांना घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयांत जाण्याची वेळ अनेक नातेवाईकांवर आली होती; परंतु ऑक्टोबरमध्ये परिस्थिती बदलली आणि रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. या महिन्यात नव्या रुग्णांची भर पडण्याचे प्रमाण कमी झाले आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे ऑक्टोबरअखेर केवळ पाचशेच्या घरात सक्रिय रुग्ण राहिले.
सक्रिय रुग्णांतही घसरणजिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार २११ होती. म्हणजे जिल्ह्यात एकाच वेळी एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू होते. ३१ ऑक्टोबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ४६१ होती.
अशी राहिली रुग्णसंख्या२३,४६० : ऑगस्टअखेर एकूण रुग्ण ३३,६४८ : सप्टेंबरअखेर एकूण रुग्ण ३८,१४१ : ऑक्टोबरअखेर एकूण रुग्ण