औरंगाबाद : राहुल शर्मा, कर्णधार स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख फलंदाजीनंतर मोक्याच्या क्षणी प्रवीण क्षीरसागर याने केलेल्या भेदक माऱ्यामुळे औरंगाबादने पुणे येथे शुक्रवारी झालेल्या एमसीएच्या सिनिअर साखळी दोनदिवसीय सामन्यात बलाढ्य डेक्कन जिमखाना संघाविरुद्ध वर्चस्व राखले.पहिल्या डावात आघाडी घेतल्यामुळे औरंगाबादला तीन गुणांची कमाई झाली. यष्टीपाठीमागे ६ झेल टिपताना यष्टिरक्षक फलंदाज प्रज्वल घोडके यानेही औरंगाबादला आघाडी मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.राहुल शर्मा (११२), स्वप्नील चव्हाण (८८), प्रज्वल घोडके (५६) आणि प्रवीण क्षीरसागर (४४) यांच्या बळावर औरंगाबादने पहिल्या डावात ३९३ धावा ठोकल्या. त्यानंतर डेक्कन जिमखाना संघाने प्रत्युत्तरात ७५ षटकांत सर्वबाद ३८४ धावा फटकावल्या. डेक्कन जिमखाना संघाकडून अमेय श्रीखंडेने १९१ चेंडूंत २७ चौकार व एका षटकारासह १८६, शुभम नागवडेने ८० चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह ११९ आणि मुकेश चौधरीने ८ चौकारांसह ४० धावा केल्या. औरंगाबादकडून प्रवीण क्षीरसागरने ८६ धावांत ५ गडी बाद केले. संदीप सहानी, स्वप्नील चव्हाण यांनी प्रत्येकी २ तर शुभम चाटेने १ गडी बाद केला.डेक्कन संघाने आज कालच्या २ बाद १० या धावसंख्येवरून खेळण्यास प्रारंभ केला. पहिल्या दिवशी नाबाद राहणाºया अमेय श्रीखंडेने आज सुरेख फलंदाजी करताना मुकेश चौधरीच्या साथीने तिसºया गड्यासाठी १३० आणि शुभम नागवडे याच्यासाथीने पाचव्या गड्यासाठी तब्बल १९२ धावांची भागीदारी केली.अमेय श्रीखंडे याच्या खेळीमुळे डेक्कनचा संघ औरंगाबाद संघावर पहिल्या डावात आघाडी घेणार असे चित्र होते; परंतु संदीप सहानी याने शुभम नागवडे याला बाद करीत आणि त्यानंतर पहिल्या दिवशी दोन फलंदाजांना तंबूत धाडणाºया प्रवीण क्षीरसागरने अमेय श्रीखंडे याच्यासह तळातील फलंदाज आदिनाथ गायकवाड आणि प्रकाश अग्रवाल यांना तंबूत धाडताना औरंगाबादला निर्णायक अशी ९ धावांची आघाडी मिळवून दिली.संक्षिप्त धावफलकऔरंगाबाद : पहिला डाव : ३९३. डेक्कन जिमखाना : (अमेय श्रीखंडे १८६, शुभम नागवडे ११९, मुकेश चौधरी ४०. प्रवीण क्षीरसागर ५/८६, स्वप्नील चव्हाण २/८१, संदीप सहानी २/४४, शुभम चाटे १/८०).
डेक्कनविरुद्ध औरंगाबादचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:41 AM
राहुल शर्मा, कर्णधार स्वप्नील चव्हाण यांच्या सुरेख फलंदाजीनंतर मोक्याच्या क्षणी प्रवीण क्षीरसागर याने केलेल्या भेदक माऱ्यामुळे औरंगाबादने पुणे येथे शुक्रवारी झालेल्या एमसीएच्या सिनिअर साखळी दोनदिवसीय सामन्यात बलाढ्य डेक्कन जिमखाना संघाविरुद्ध वर्चस्व राखले. पहिल्या डावात आघाडी घेतल्यामुळे औरंगाबादला तीन गुणांची कमाई झाली. यष्टीपाठीमागे ६ झेल टिपताना यष्टिरक्षक फलंदाज प्रज्वल घोडके यानेही औरंगाबादला आघाडी मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.
ठळक मुद्देप्रवीण क्षीरसागरचे ५ बळी : प्रज्वल घोडकेही चमकला