लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार विद्यापीठ, उपकेंद्र आणि महाविद्यालयातील विज्ञान व वाणिज्यच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पहिल्या फेरीत १९१६, दुसऱ्या फेरीत ६८१ आणि तिसºया फेरीत अवघे ५२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे तिसºया फेरीतील प्रवेशाला २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.विद्यापीठ प्रशासनाने मागील वर्षीपासून सीईटीद्वारे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मागील वर्षी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत अभूतपूर्व गोंधळ उडाला. त्याचा परिणाम शैक्षणिक सत्र तब्बल दोन महिन्यांनी उशिरा सुरू झाले होते. यापासून धडा घेऊन यावर्षी विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर प्रवेशासाठी २७ फेब्रुवारी २०१८ रोजी जाहिरात देऊन सीईटी प्रक्रियेला सुरुवात केली होती. २० एप्रिल ते ३ मेदरम्यान प्रत्येक विषयांची स्वतंत्र सीईटी घेण्यात आली. या सीईटीसाठी १८ हजार १६५ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यातील १४ हजार ९१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र यातील अवघ्या ५ हजार ९२२ विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. यादरम्यान ४ मे रोजी सीईटीचा निकाल जाहीर केला. यानंतर ६ मे ते २ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना विद्यापीठातील विभाग, महाविद्यालयाचा पसंतीक्रम देण्याची मुदत दिली.यात अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे पसंतीक्रमाला तब्बल चार वेळा मुदतवाढ द्यावी लागली. यानंतर ४ जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करून पहिल्या फेरीसाठी ५ हजार ६०३ विद्यार्थी पात्र ठरविण्यात आले. या फेरीत अवघ्या १९१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसºया प्रवेश फेरीत ४ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरवले. या फेरीतील प्रवेशाची मुदत १६ ते २१ जूनदरम्यान होती.या फेरीत अवघे ६८१ प्रवेश झाले आहेत. यानंतर शेवटच्या तिसºया फेरीत ४ हजार ४०३ प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले. या फेरीतील प्रवेशाची मुदत सोमवार (दि.२५) पर्यंत होती.तोपर्यंत या फेरीत अवघे ५२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तीन प्रवेश फेºयामध्ये एकूण ३१२४ विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत प्रवेश घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अल्प प्रतिसादामुळे तिसºया फेरीतील प्रवेशाला सदर घटनेची माहिती दिली नाही. शाळा इमारतीचे तात्काळ स्ट्रक्चर आॅडिट करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.औरंगाबाद पूर्व तालुक्यात केम्ब्रिज चौकानंतर डाव्या बाजूला जालना रोडपासून दीड कि.मी. अंतरावर पद्मश्री शंकरबापू आपेगावकर इंग्लिश स्कूल आहे. या शाळेची इमारत तीन मजली असून, ही इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. शुक्रवारी २२ जून रोजी दुपारच्या सुमारास या शाळेच्या मध्यवर्ती भागाच्या कॉलमचा अचानक आवाज झाला, मोठा आवाज झाल्याने विद्यार्थी घाबरले, काय झाले हे समजण्यापूर्वीच तात्काळ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. कॉलम फक्त १ फूट जागेवर फुटल्यामुळे या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.मुलांना शनिवारची सुटी जाहीर करण्यात आल्यानंतर सोमवारी पुन्हा शुक्रवारपर्यंत सुटी वाढविण्यात आली.विद्यार्थ्यांनी पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर काही पालक सोमवारी शाळेत गेले असता त्या पालकांना शाळेत प्रवेश नाकारल्यामुळे पालकांनी ‘लोकमत’कडे तक्रार केली. दरम्यान, शिक्षण अधिकारी राकेश साळुंके व शिक्षण विस्तार अधिकारी विद्या दीक्षित यांनी घटनास्थळी भेट देऊन पालकांना शाळेत प्रवेश दिला. घटनेची माहिती शिक्षण विभागाला का दिली नाही, पालकांना आत येण्यास का अडविले, म्हणून साळुंके यांनी संस्थाचालकाला जाब विचारला. त्यांनी घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची हमी दिल्यानंतर पालक शाळेतून बाहेर पडले.शाळा इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करावे, अशी मागणी विठ्ठल भोसले, संतोष बागल, बंटी सुराणा, पुंजाराम इत्थर, ईश्वर शेळके, रामेश्वर बागल, जगदीश इत्थर, प्रमोद शेळके, किशोर गोजे, स्वप्नील मुळे, राधाकिसन उकिर्डे, उदय उकिर्डे, रामकिसन इत्थर आदी पालकांनी शिक्षणाधिकाºयांकडे केली आहे.लाखो रुपयांची उधळपट्टीपदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीसाठी विद्यापीठ प्रशासनाने लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. सीईटीचे नियोजन दिलेल्या एसएमबी कंपनीला नोंदणी केलेल्या १८ हजार १६५ विद्यार्थ्यांच्या मानधनापोटी २९ लाख ९७ हजार २२५ रुपये द्यावे लागणार आहेत. यात प्रतिविद्यार्थी १६५ रुपयेप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. याशिवाय जाहिरात, कर्मचारी, अधिकाºयांच्या मानधनापोटी लाखो रुपये खर्च केल्याचे सूत्रांनी सांगितले. याच वेळी प्रवेश घेणाºया खुल्या गटातील विद्यार्थ्यांना २०० रुपये आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाच्या तिसºया फेरीपर्यंत ३१२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, या फेरीतील प्रवेशाला २८ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. येत्या तीन दिवसांत तिसºया फेरीत पात्र ठरलेल्या ४४०३ विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के विद्यार्थी निश्चितपणे प्रवेश घेतील. रिक्त राहिलेल्या जागा संबंधित विभाग आणि महाविद्यालयांमार्फत स्पॉट अॅडमिशनच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.- डॉ. वाल्मीक सरवदे, सीईटी समन्वयक
औरंगाबाद :पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:48 AM