लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याने गोंधळ घालत आत्महत्या करण्याची धमकी देण्याचे सत्र सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात असाच प्रकार घडला आहे. कॉपी पकडलेल्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका फाडत गोंधळ घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.विद्यापीठातील समाजशास्त्र विभागामध्ये एम. फिल अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. २५ एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेत पर्यवेक्षकाने एका विद्यार्थ्याची कॉपी पकडली. ही कॉपी जप्त केल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कॉपी पकडलेल्या पर्यवेक्षकालाच दमदाटी करीत उत्तरपत्रिका फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे विभागात गोंधळ उडाला. परीक्षार्थी विद्यार्थ्याने विभागातील प्राध्यापकांविषयी अर्वाच्च भाषा वापरली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या गोंधळात विभागातील प्राध्यापक डॉ. पद्माकर सहारे यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती योग्यपणे हाताळल्यामुळे पुढील कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उत्तरपत्रिका फाडलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यास दिल्याचेही समजते.एवढा गोंधळ होऊनही विभागाची बाहेर बदनामी होऊ नये, म्हणून याची कोठेही वाच्यता केली नाही. या विभागाचे प्रमुख डॉ. संजय साळुंके हे विद्यापीठाचे प्रभारी अधिष्ठाता आहेत. त्यांनीही संबंधित गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.शिकवले नसल्याचा गंभीर आरोपएम. फिलच्या परीक्षेत गोंधळ घालणाºया विद्यार्थ्याने परीक्षेतच प्राध्यापकांवर गंभीर आरोप केले आहेत. एम. फिलचा अभ्यासक्रम प्राध्यापकांनी शिकवलाच नसल्याचे ‘त्या’ विद्यार्थ्याचे म्हणणे होते. विभाग प्रमुख नियमितपणे विभागात येत नाहीत. प्रशासकीय इमारतीमध्येच असतात. अनेकवेळा सह्या घेण्यासाठी सुद्धा मुख्य इमारतीत जावे लागते. तेव्हा प्राध्यापकच शिकवत नाहीत, तर आम्हाला कशाला दोषी धरतात, असेही त्या विद्यार्थ्याने म्हटल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या विद्यार्थ्याच्या आरोपावर विभागप्रमुखांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या२२२२विषयी विभागप्रमुख डॉ. संजय साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. विद्यार्थ्याच्या या आरोपामुळे विद्यापीठात तासिका होत नसल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.नाईक महाविद्यालयातही प्रकरण दडपलेडिसेंबर महिन्यात व्यवस्थापनशास्त्र विषयाच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका व्हॉटस् अॅपवर पाठविली होती. याचा भंडाफोड होताच मोठा गदारोळ झाला होता. या सत्राच्या परीक्षेतही वसंतराव नाईक महाविद्यालयातून एका विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याने बाहेर पाठविली होती. हा विद्यार्थी वेळीच पकडण्यात आला. यात महाविद्यालयाची बदनामी होईल, या कारणामुळे सदरील प्रकरण प्राचार्यांनी दडपल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्या विद्यार्थ्यावर महाविद्यालयाने कारवाई केली आहे.
औरंगाबादेत परीक्षार्थीने गोंधळ घालत फाडली उत्तरपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:12 AM
महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत कॉपी पकडल्यानंतर विद्यार्थ्याने गोंधळ घालत आत्महत्या करण्याची धमकी देण्याचे सत्र सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात असाच प्रकार घडला आहे.
ठळक मुद्देविद्यापीठ : समाजशास्त्र विभागातील प्रकार