लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडकोतील भाडेकरारावर (लीज होल्ड) असलेल्या मालमत्ता फ्री होल्ड (मालकीहक्क) होण्याची शक्यता असून, महिनाभरात याबाबत सिडको संचालक मंडळ निर्णय घेईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.शिवसेना आणि भाजपमध्ये सिडकोवासीयांच्या समस्या सोडविण्यासाठी चढाओढ लागली असून, सिडकोच्या निर्णयानंतरच ३५ हजार मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार आहे. शासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष असून सध्या तरी सेना-भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे.मंगळवारी मुंबईत गगराणी यांच्या दालनात खा. चंद्रकांत खैरे नेतृत्वाखाली नगरसेवक राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, वीरभद्र गादगे, साहेबराव घोडके आदींनी सिडकोतील विविध मुद्यांवर चर्चा केली. या चर्चेचा तपशील वैद्य यांनी सांगितला. या चर्चेच्या वेळी गगराणी यांनी त्यांच्या दालनातूनच व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सिडकोचे औरंगाबादमधील मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया व इतर अधिकाºयांसोबत सिडकोतील विविध प्रश्नांवर चर्चा केली.धार्मिक स्थळे नाममात्रदराने नियमित करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. २४ मीटर व १८ मीटर रस्त्यावर असलेल्या व्यावसायिक मालमत्तांना शुल्क लागेल. त्यापेक्षा लहान रुंदीच्या रस्त्यांवरील मालमत्तांना कर लागणार नाही. या मुद्यांवर गगराणींसोबत चर्चा झाल्याचे सेनेने कळविले आहे.
औरंगाबाद : सिडकोतील घरांचे फ्री होल्ड महिन्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:01 AM
सिडकोतील भाडेकरारावर (लीज होल्ड) असलेल्या मालमत्ता फ्री होल्ड (मालकीहक्क) होण्याची शक्यता असून, महिनाभरात याबाबत सिडको संचालक मंडळ निर्णय घेईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे३५ हजार मालमत्ता : व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा