औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ६५३ झाला आहे.
घाटी रुग्णालयात बेगमपुरा आणि बायजीपुरा येथील दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती घाटीचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी दिली. दरम्यान, सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात ९ महिला १५ पुरुषांचा समावेश आहे. यात पुंडलिक नगर २, एन ८ येथील १, रामनगर १ , संजयनगर ५, प्रकाशनगर १, एन ७ येथील ४, रोशनगेट १, गांधीनगर १, दत्त नगर १, भडकलगेट १, चिकलठाणा १, शहानुरमियाँ दर्गा येथील १, अन्य ठिकाणचे दोन आणि महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला बाधा झाल्याचे आढळून आले.
पाच दिवसात २७५शुक्रवारी १००, शनिवारी ३०, रविवारी ५०, सोमवारी ६९, मंगळवारी २६ अशी एकूण २७५ रुग्णांची भर पडली. तर दुसरीकडे गेल्या तीन दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही शंभरी गाठल्या गेली आहे.
नव्या भागातील संक्रमण चिंताजनकजिल्ह्यात खुलताबाद, फुलशिवरा गंगापूर, सातारा गाव तर शहरात चंपा चौक, एन 7, एन 8, शहानुरमियाँ दर्गा परिसर, कोतवालपुरा, जुना बाजार, जुना मोंढा या नव्या परिसरासह कोरोनामुक्त झालेले परिसर एन २, एन ४, एन ११, सातारा परिसर या भागातही नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर रामनगर, संजयनगर, रोहिदासपुरा या मुकुंदवाडी भागात रुग्णांची सर्वाधिक संख्येची नोंद झाली आहे.