शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने भाजपा उमेदवार मेघना बोर्डीकरांचा गावातून काढता पाय
5
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 स्‍टॉक...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा
6
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
7
शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
8
Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!
9
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
10
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
11
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
12
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
13
शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
14
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
15
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
16
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
17
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
18
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
19
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
20
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!

औरंगाबादेत ६,८०० कोटींचा रशियन स्टील प्रकल्प येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:36 AM

पहिल्या टप्प्यात ८०० कोटी 

ठळक मुद्देऑरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) प्रकल्प होणारदुसऱ्या टप्प्यात ६ हजार कोटींची गुंतवणूक

औरंगाबाद : रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टील (एनएलएमके) औरंगाबादमध्ये पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रुपयांची, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी बुधवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रशियाचे वाणिज्यदूत ए. शावार्लेव्ह उपस्थित होते.इलेक्ट्रिक स्टील निर्मितीसाठी एनएलएमके कंपनीची जगभर ओळख असून, ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये (दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर) शेंद्रा किंवा बिडकीनमध्ये या कंपनीने प्रकल्पासाठी जागा पाहिली असून, ती देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. 

औरंगाबादच्या ऑरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) हा प्रकल्प होणार असून, प्रकल्प सुरू करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कंपनीचे प्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींनी तीन वेळा वरील जागेची पाहणी केली आहे. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर लवकरच कंपनीच्या कामाला सुरुवात होणार आहे. शासनाच्या विभागांकडून कंपनीच्या नियोजित प्रकल्पास सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी मागणी कंपनीच्या शिष्टमंडळाने देसाई यांच्याकडे केली. दरम्यान, या कंपनीमुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होण्यास मदत होणार असून, अनेकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे या कंपनीला शासन स्तरावर सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली. यावेळी डीएमआयसीचे संचालक गजानन पाटील, एनएलएमके कंपनीचे संचालक व्ही. शेव्हलेव्ह, ए. काव्होसीन, कार्यकारी संचालक एन. गुप्ता, प्रकल्प व्यवस्थापक पी. रिचॉकॉव्ह आदी उपस्थित होते.

देशांतर्गत स्टील उपलब्ध होणारभारतात मागील तीस वर्षांत विजेची मागणी अत्यंत वेगाने वाढलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सबस्टेशनची गरज तीसपटींनी वाढलेली आहे. वीज वहन व ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे विशेष दर्जाचे स्टील एनएलएमके कंपनी तयार करते. एनएलएमके सध्या भारताला २० टक्के ट्रान्स्फॉर्मर स्टील पुरवत आहे. ही कंपनी महाराष्ट्रात सुरू झाल्यास देशांतर्गत स्टील उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरणाद्वारे दिली. 

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय