औरंगाबाद : राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत यजमान औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, मुंबई, लातूर, बीड, वर्धा संघांनी विजयी सलामी दिली आहे.विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत ३८ मुला-मुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा साखळी- बाद पद्धतीने होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्य संघटनेचे सचिव प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, नाजूक पाखले, फुलचंद सलामपुरे, उदय डोंगरे, पी.आर. थोटे, संतोष खेडे, विश्वास गायकर, अरविंद विद्यासागर, एकनाथ साळुंके, संदीप लंबे, गुलजार शेख उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, प्रवीण शिंदे, राकेश खैरनार, प्रा. प्रदीप बोरसे, दीपक रुईकर, फकीर घोडे, सुरेश फुके, दिनेश वंजारे, गणेश बेटुदे, अक्षय बिरादार, सचिन बोर्डे, संतोष अवचार, भीमा मोरे, सुजित चौधरी, योगेश कुलकर्णी, आदी परिश्रम घेत आहेत.निकाल (मुले) : औरंगाबाद जिल्हा विजयी वि. ठाणे ५-४, बीड वि. वि. जळगाव १०-०, लातूर वि. वि. सोलापूर मनपा ४-२, पिंप्री चिंचवड बरोबरी वि. ठाणे १-१, अमरावती वि. वि. नागपूर २-०, यवतमाळ वि. वि. औरंगाबाद मनपा ५-०, सोलापूर जिल्हा वि. वि. अकोला मनपा ४-२, नवी मुंबई वि. वि. जळगाव जिल्हा ११-०, वर्धा वि. वि. नागपूर मनपा ६-०, अमरावती जिल्हा वि. वि. अकोला जिल्हा ६-०, बीड वि. वि. सांगली १०-०, लातूर वि. वि. यवतमाळ ४-०, मुंबई उपनगर वि. वि. नागपूर ५-०, सोलापूर मनपा वि. वि. औरंगाबाद मनपा १०-०.
राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत औरंगाबाद, जळगाव, बीडची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:00 AM