रऊफ शेखफुलंब्री : औरंगाबाद -जळगाव महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरु असून गणोरी फाटा ते सिल्लोड हद्दीपर्यंत ३ हजार ९०० झाडे तोडण्यात आलेली आहेत. या झाडांची तोडणी परवानगी देताना वन विभागाने महामार्ग विभागाकडून एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावण्यात यावी, अशा प्रकारचा बाँड शासना नियमानुसार करून घेतला आहे, त्यामुळे संबंधित विभागाला आता त्याच्या मोबदल्यात १९ हजार ५०० झाडे लावावी लागणार आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही, ये पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शासनाने एक झाड तोडण्याच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याचा नियम केल्याने त्यानुसार या महामार्गावर वृक्षलागवड करावी लागणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी शेतातील झाड तोडून विकता येईल, पण त्याच्या बदल्यात पाच पट झाडे लावावी लागतील, अशा प्रकारचा आदेश शासनाने काढला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदा होणार असून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठता येऊ शकेल.शेतकºयांना आपल्या शेतातील झाडे तोडण्यासाठी वन विभागाच्या वतीने परवानगी देण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याला एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शासनाने काढलेल्या आदेश हा केवळ शेतकºयांना लागू होणार नसून तो सर्वांना लागू होणार आहे. यात लोकहिताचे काम करताना अथवा एखादा रस्ता रुंदीकरण करताना ठेकदाराकडून जी झाडे तोडली जातील, त्याच्या पाच पट झाडे त्या विभागाला लावणे बंधनकारक झाले आहे.झाडे तोडण्याची परवानगी आता वनविभागाकडेआता झाडे तोडायची असल्यास परवानगी घेण्यासाठी वन विभागाकडे जावे लागेल. कारण झाडे तोडण्याची परवानगी पूर्वी महसूल विभागाकडे होती. वन विभाग झाड तोडण्याची परवानगी मागणाºयाकडून एका झाडाच्या बदल्यात पाच झाड लावण्याच्या बाँड लिहून घेणार आहे. शंभर रुपयांच्या बाँडवर शपथपत्रशेतकºयांना आर्थिक अडचणीत आपल्या शेतातील झाडे तोडून विकता येऊ शकतात. त्यासाठी वन विभागाकडे सातबारा व एक अर्ज करावा. आमच्याकडून शंभर रुपयाच्या बाँडवर एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याचे शपथपत्र लिहून घेतले जाईल व त्यानंतरच परवानगी मिळेल, असे वन अधिकारी शिवाजी दहिवाल यांनी सांगितले.
औरंगाबाद-जळगाव महामार्गावर लावणार १९ हजार ५०० झाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:43 AM