शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांचा ‘टक्का’ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 4:30 PM

इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरु

ठळक मुद्देयुतीचा आकडा वजनदारएकूण ६१६ मतदार

- विकास राऊत 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांची संख्या वाढली असून, या मतदारसंघाच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आॅगस्ट महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यास त्यांच्याकडील नगरसेवक सदस्यांचा आकडा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत वजनदार आहे. युतीकडे २९८, आघाडीकडे २५०, एमआयएम व अपक्ष मिळून एकूण ६१६ मतदार आहेत. मागील निवडणुकीत ४८० च्या आसपास मतदार होते. येणाऱ्या निवडणुकीत सेना-भाजप युती आणि काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सध्या काँगे्रसकडे हा मतदारसंघ असून, आ. सुभाष झांबड त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात मनपा, नपा, जि.प.मधील ३६१ मतदार आहेत, तर जालना जिल्ह्यात जि.प., न.प. मिळून २५५ मतदार आहेत. एकूण ६१६ मतदारांची संख्या आहे. ६८ मतदार इतर अपक्ष व इतर पक्षांचे आहेत. नव्याने झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतींमुळे १२० च्या आसपास सदस्य संख्या वाढली आहे, तर औरंगाबाद पालिकेतही १६ मतदार सदस्य वाढले आहेत. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी होणारी निवडणूक उमेदवारांना बजेटच्या आवाक्याबाहेर घेऊन जाणारी ठरण्याची चिन्हे आहेत. पक्ष म्हणून विचार केला, तर १६७ सदस्य कॉँग्रेसकडे आहेत. त्याखालोखाल भाजपकडे १५९, तर शिवसेनेकडे १३९ मतदार सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८३, तर एमआयएमकडे २७ च्या आसपास मतदार सदस्य असल्याचा आकडा इच्छुकांकडे नोंद आहे. ४१ मतदार इतर पक्षांचे व अपक्षांचे आहेत. 

उमेदवारीसाठी सर्वांचे प्रयत्न हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, त्यामुळे सेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. ज्याचे जास्त सदस्य त्याच्याकडे मतदारसंघ या आधारावर भाजपही मतदारसंघावर दावा करण्याच्या विचारात आहे. बाहेरून उमेदवार मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत पसंतीनुसार मतदान होत असते.४ पहिल्या पसंतीची मते सेना-भाजप युतीकडे जास्त आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्षात नावापुरते कार्यरत असलेले शिवसेना-भाजपकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीतील काहींनी कामदेखील सुरू केले असून, शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत स्नेहभोजन सुरू केले आहे, तसेच दुष्काळी मदतीसाठी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. ४भाजप आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन जण इच्छुक असून, त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजप असे मिळून पहिल्या पसंतीच्या मतांची गोळाबेरीज होत असली तरी तगडे अर्थकारण करणारा उमेदवार या निवडणुकीत बाजी मारील. राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये येण्याची काही जणांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना