औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत मराठवाड्यात औरंगाबादने आघाडी घेतली आहे. नांदेड, बीड, हिंगोली, जालना हे चार जिल्हे पिछाडीवर असल्यामुळे विभागीय प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी तंबी दिली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही लसीकरणाचा टक्का वाढत नसल्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे.
मराठवाड्यात दोन लाख नागरिकांचे लसीकरण रोज होणे गरजेचे आहे; परंतु ते प्रमाण सध्या फक्त २५ हजारांच्या आसपास आहे. विभागात औरंगाबाद पहिल्या क्रमांकावर आहे. जालना पाचव्या, परभणी दुसऱ्या, हिंगोली सातव्या, नांदेड आठव्या, बीड सहाव्या, लातूर चाैथ्या, तर उस्मानाबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ७५, तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे ३८ टक्के आहे. दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ५७.२९ टक्के आहे. १६ लाख ४४ हजार ६१८ लसींचा साठा आहे.
नव्याने एबीसीडी करावी लागणारदुसऱ्या लाटेत विभागात आरोग्य व्यवस्थापन करताना प्रचंड त्रास झाला. कोरोनाची दुसरी लाट, म्युकरमायकोसिस, डेल्टा विषाणूमुळे इंजेक्शन, बेडस् आणि ऑक्सिजन पुरवठ्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मागील अनुभव पाहता ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा प्रसार जास्त असल्यामुळे विभागात लसीकरण १०० टक्के करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. औषधी, इंजेक्शन, वाढीव रुग्णसंख्या यासाठी पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार असल्याने निधीदेखील जास्त लागेल, असे सूत्रांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेला खर्च अद्याप शासनाकडून अनुदानरूपाने देण्यात आलेला नाही.
१८ वर्षांवरील लोकसंख्या : १ कोटी ५६ लाख २६ हजार ३००लसीकरणाची मात्रा किती लागणार : ३ कोटी १२ लाख ५२ हजार ६००किती जणांनी घेतला पहिला डोस : १ कोटी १८ लाख ५० हजार ३५७किती जणांनी घेतला दुसरा डोस : ६० लाख ४३ हजार ९६०