शिवसेनेचा मागील काही वर्षांपासून अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून औरंगाबादमध्ये ४ थ्या फेरीनंतर जाधव यांनी इम्तियाज जलील यांना मागे सारत 3199 मतांची आघाडी घेतली आहे.
मतदारसंघः औरंगाबादफेरीः ४ थी
आघाडीवरील उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष मतंः 53855
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी मतंः 50656
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे पक्षः शिवसेना मतंः 46344
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः सुभाष झांबड पक्षः कॉंग्रेस मतंः11225
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता.