औरंगाबाद : शिवसेनेचा मागील काही वर्षांपासून अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर सुरुवातीपासूनचा जलील आघाडीवर राहिले. मात्र, आता १७ व्या फेरीअखेर इम्तियाज जलील यांची आघाडी काही अंशी कमी झाली आहे.
मतदारसंघः औरंगाबादफेरीः 17 वी फेरी
आघाडीवरील उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी मतंः 274963
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे पक्षः शिवसेना मतंः 263111
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष मतंः 198739
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः सुभाष झांबड पक्षः कॉंग्रेस मतंः9721
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता.