औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या मतदारसंघातील चौरंगी लढतीत विजय कुणाचा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक फेरीनुसार शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांच्यातील आघाडी कमी जास्त होत आहे. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले जलील शेवटच्या काही फेऱ्यात पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरावर मागील चारही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. यावेळच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेला प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतरही या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानानंतर झालेल्या आरोप- प्रत्यारोपामुळेही ही निवडणूक गाजली. वंचित आघाडीने या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार देऊन प्रयोग केला आहे. तो अत्यंत यशस्वी होताना दिसत असून २० फेऱ्यापर्यंत ते आघाडीवर होते. मात्र, २१ व्या फेरीमध्ये सेनेच्या खैरेंनी ७०० मतांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्येही आघाडीवरून चुरस वाढत जात आहे. शेवटच्या माहितीनुसार जलील यांनी परत ९ हजारांची आघाडी घेतली आहे.
मतदारसंघः औरंगाबादफेरीः २१ वी फेरी
आघाडीवरील उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी मतंः 370327
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे पक्षः शिवसेना मतंः 361060
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष मतंः 267370
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः सुभाष झांबड पक्षः कॉंग्रेस मतंः 86137
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता.