Aurangabad Lok Sabha Result 2024: संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळत आहेत. येथे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire), महायुतीचे संदीपान भुमरे ( Sandeepan Bhumare) आणि विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील ( Imtiyaj Jalili) यांच्यात तिहेरी सामना आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, वैजापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावले आहेत. ७ टेबलची एक रांग अशा दोन रांगावर मतमोजणी सुरू आहे.
सध्याच्या आकडेवारी नुसार, एमआयएमचे इम्तियाज जलील हे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. चंद्रकांत खैरे ११ हजार ४३४, संदिपान भुमरे १६ हजार ४०५ तर इम्तियाज जलील १९ हजार ७४५ अशी मते आहेत.