Aurangabad Lok Sabha Result 2024: मंगळवारी दुपारी १:०० वाजेपर्यंत ११ व्या फेरीची मतमोजणी सुरू होती. अंतिम माहिती आली तेव्हा महायुतीचे संदिपान भुमरे १,९५,८८१ मते घेऊन त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यापेक्षा १६,६८८ मतांनी आघाडीवर होते. महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना १,२४,३१३ मते होती. भुमरे यांच्यापेक्षा ते ७१ हजार ५६८ मतांनी पिछाडीवर होते.
संजय शिरसाट यांचा खैरेंना टोलातुम्हीच सांगत होता, नारायण राणे पडत आहेत, सुनील तटकरे पडत आहेत. आता ते आघाडीवर आहेत. भुमरेही येतील. पंधराव्या फेरीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. आता विजयाचे लाडू आम्ही खाऊ.-आ. संजय शिरसाट
मतमोजणीच्या परिसरातील चर्चा प्रतिचर्चा; कुजबुज-तीन लाख मतांच्या आतच जलील थांबतील, अशी चर्चा-इथे जर इम्तियाज जलील उभे नसते, तर चंद्रकांत खैरे तीन लाख मतांनी निवडून आले असते, अशी कुजबुज.
खैरेंना अति आत्मविश्वास नडलाचंद्रकांत खैरे यांना वातावरण अनुकूल असताना व एक्झिट पोलमध्ये तेच आघाडीवर राहणार, असे चित्र निर्माण झाले असतानाही प्रत्यक्षात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. हा मोठा धक्का मानला जात आहे. खैरेंना अति आत्मविश्वास नडला, अशी चर्चा सुरू झाली आहे.
संदीपान भुमरे यांना सीएमचा फोन...मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यावर बाजूला जाऊन संजय शिरसाट बोलले. नंतर तोच फोन त्यांनी भुमरेंना दिला. तेही बाजूला जाऊन बोलले. सतत संपर्कात राहून मुख्यमंत्री औरंगाबादचे अपडेट्स घेत आहेत.
भुमरे कुटुंबीयांंना आनंदभुमरे आघाडीवर असल्याने त्यांची आई व पत्नी यांनी आनंद व्यक्त केला. साहेब लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गी लावतील, असेही त्यांनी मत व्यक्त केले.