शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

ग्रामीण मतदार संदीपान भुमरेंच्या विजयाचे शिल्पकार; जाणून घ्या मतदानाची आकडेवारी

By विकास राऊत | Published: June 05, 2024 1:27 PM

Aurangabad Lok Sabha Result 2024: भाजपच्या संघटन बळावर यश; १ लाख ३४ हजार ६५० मतांनी संदीपान भुमरे विजयी

Aurangabad Lok Sabha Result 2024: छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे १ लाख ३४ हजार ६५० मताधिक्याने विजयी झाले. औरंगाबाद पश्चिम, गंगापूर आणि वैजापूर हे विधानसभा मतदारसंघ भुमरे यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तळागाळात शिंदेसेनेचे संघटन नसताना केवळ भाजपाच्या बूथबांधणीमुळे भुमरे यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा गड सर करता आला. 

मराठवाड्यात महायुतीला ही एकमेव जागा जिंकता आली. एमआयएमचे उमेदवार माजी खा. इम्तियाज जलील हे ३ लाख ४१ हजार ४८० मते घेत दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे २ लाख ९३ हजार ४५० मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसरखान यांना ६९ हजार २६६, तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना ३९ हजार ८२८ मते मिळाली. भुमरे यांना कन्नडमधून ६८२३०, औरंगाबाद मध्य ५९७४०, औरंगाबाद पश्चिम ९५५८६, औरंगाबाद पूर्व ६३२३८, गंगापूर ९४४१९, वैजापूर ९३२३१ व पोस्टल १६९६ सह ४ लाख ७६ हजार १३० मते मिळाली.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये जलील आघाडीवर होते. त्यानंतर भुमरे यांनी २४८ मतांची आघाडी घेतली. २७ व्या फेरी अखेरीस त्यांचे मताधिक्य १ लाख ३४ हजार ६५० पर्यंत गेले. प्रत्येक फेरीत या तिन्ही उमेदवारांना मते मिळत गेली. ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतविभाजन होऊन मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होईल, या चर्चेला पाचव्या फेरीपासून ब्रेक लागला. भुमरे यांना सगळ्याच मतदारसंघातून जोरदार मताधिक्य मिळाले, १३ व्या फेरीत खैरे यांना पराभव लक्षात आल्याने त्यांनी मतमोजणी केंद्र सोडले, तर जलील यांनी पराभव स्वीकारत भुमरे यांची गळाभेट घेतली.

मराठवाड्यात महायुतीला एकमेव यश......मराठवाड्यात महायुतीला भुमरे यांच्या रूपाने एकमेव जागेवर यश मिळाले. महाविकास आघाडीला मराठवाड्यात यश मिळाले; परंतु औरंगाबाद मतदारसंघ राखता आला नाही. १४ तास मतमोजणी चालली. पोस्टल मतमोजणीसह अखेरची फेरी जाहीर करण्यासाठी प्रशासनाला रात्रीचे १० वाजले. विजयी उमेदवार भुमरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मतदारसंघ निवडणूक प्रमुख गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाट, राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती.

धनुष्यबाण चिन्हाची किमया...महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची निशाणी धनुष्यबाण होती. त्यामुळेही शिवसेनेच्या मूळ मतदारांनी बाण म्हणजेच शिवसेना असे समजून मतदान केल्याचे निकालानंतर बोलले गेले.

भाजपने मार्ग केला सुकर...भुमरे यांना शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळाली. त्यामुळे १५ दिवसच प्रचाराला मिळाले. भाजपविना मतदारसंघ लढणे त्यांना शक्य नव्हते. केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड, निवडणूक प्रमुख अतुल सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय खंबायते आदींनी बूथरचनेसह विविध समुदायांचे मेळावे घेत भुमरेंच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

शिंदेसेनेचे नियोजन...शिंदेसेनेचे ग्रामीण संघटन यापुढे जोर धरेल, परंतु लोकसभेच्या तोंडावर संघटन करण्यास संधी मिळाली नाही. मतदारसंघाबाहेरील पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले, तर शहरात आ.संजय शिरसाट यांनी पत्रपरिषद घेत महिनाभर किल्ला लढविला. पणनमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, विलास भुमरे, रमेश पवार, भरत राजपूत जीव ओतून काम केले.

जालन्यात साथ, इकडे हात...महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी काँग्रेस औरंगाबाद मतदारसंघात परिश्रम घेतले नाहीत, अशी चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्यासाठी ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवतोड मेहनत केल्याचे निकालावरून दिसते आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेली मते.....विधानसभा..........संदीपान भुमरे............इम्तियाज जलिल.........चंद्रकांत खैरे..............अफसरखान.......हर्षवर्धन जाधव ...... नोटा....कन्नड................६८२३०...................३७२१६...................४२३३८...............६१८०......................३५२३३...........७४८औरंगाबाद मध्य......५९७४०................८५९३७...................४३४८०..........१३२६२.......................४४९..................१०६७औरंगाबाद पश्चिम.....९५५८६............५४८१७..................५८३८२............१६००२........................६५२................१४०९औरंगाबाद पूर्व.....६३२२८.................८९१४३..............३८३५०................८१४५.......................३७६..............१०२४गंगापूर............९४४१९..................४८४५१...........५३११३................१४९१४.....................१९६१.................७६५वैजापूर ...............९३२३१................२५२२३............५६२०७.............१०५८४.................९८३.................७१६एकूण...............४७६१३०................३४१४८०...........२९३४५०............६९२६६....................३९८२८..................५८५६

पोस्टल मते कुणाला किती?संदीपान भुमरे १६९६, इम्तियाज जलील ६०३, चंद्रकांत खैरे १५८०, अफसरखान १७९ तर हर्षवर्धन जाधव यांना १७४ पोस्टल मते मिळाली. एकूण ४५५६ पोस्टलच्या मतांची बेरीज आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४