लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचे दायित्व महापालिकेवर येऊन ठेपले आहे. मागील काही दिवसांपासून सत्ताधाºयांकडून बस खरेदीवर अधिक भर देण्यात येत आहे. बुधवारी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मुंबईत स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांची भेट घेतली. त्यांनी युद्धपातळीवर पाच इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची मुभा दिली.स्मार्ट सिटीच्या बैठकीबद्दल माहिती देताना मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले की, प्रायोगिकतत्त्वावर पाच सिटी बसेस खरेदी करण्यास पोरवाल यांनी परवानगी दिली आहे. पाचही बसेस इलेक्ट्रिक पद्धतीच्या खरेदी करा, असे त्यांनी सांगितले आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी तीस लाख रुपयांची तरतूद केली आहे. बस खरेदीसाठी हा निधी वापरता येईल. याशिवाय आणखीन निधीची गरज पडल्यास स्मार्ट सिटीच्या निधीतून तरतूद केली जाईल. पैशाची चिंता करून नका, असे पोरवाल म्हणाले. बस खरेदीसाठी परवानगी मिळाल्यामुळे केंद्र सरकारच्या ई-पोर्टलचा अभ्यास करून खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाईल. जानेवारी महिन्यात ठरल्याप्रमाणे सिटी बससेवा सुरू होईल, असा विश्वास मुगळीकर यांनी व्यक्त केला. २३ जानेवारी रोजी ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून (पान २ वर)
औरंगाबाद मनपात येणार ५ इलेक्ट्रिक बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:40 AM