औरंगाबाद बाजारपेठेवर थंडीचा परिणाम जाणवला असून, पालेभाज्यांची आवक घटली आहे. परिणामी पालेभाज्यांचे भाव वधारले आहेत. भाजीमंडईत किरकोळमध्ये २० ते २५ रुपये किलो विक्री होणारी काकडी रविवारी ३० रुपयांत विक्री झाली.
पालेभाज्यांमध्ये मेथी व कोथिंबिरीचे भाव वधारून ८ ते १० रुपये गड्डी विकली जात आहे. आवक वाढल्याने गाजर व दुधीभोपळ्याचे भाव १०० ते ३०० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे ७०० ते १ हजार रुपये व ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. मात्र, आवक कमी होताच टोमॅटो महागून ५०० ते १,५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला.
मागील आठवड्यात कांदा व बटाट्याचे भाव स्थिर होते. भाजीमंडईत वाढलेल्या थंडीचा एवढा परिणाम झाला की, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यानच भाज्या खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. सायंकाळी एक टक्काही भाजीपाला विक्री होत नसल्याचे चित्र आहे.