शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

औरंगाबाद : एमआयएम नगरसेवकाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:01 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : एमआयएम पक्षाच्या आठ नगरसेवकांवर अगोदरच अपात्रतेची टांगती तलवार असताना शुक्रवारी मनपा आयुक्त डी. एम. ...

ठळक मुद्देखळबळजनक : अगोदरच आठ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एमआयएम पक्षाच्या आठ नगरसेवकांवर अगोदरच अपात्रतेची टांगती तलवार असताना शुक्रवारी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आणखी एका नगरसेवकाला अपात्रतेची नोटीस बजावल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. एकाच पक्षाच्या नऊ नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जाण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना होय.औरंगपुरा भाजीमंडईच्या पाठीमागे सीटीएस नं. ३३९८/बी, ३३९८/२, ही जागा उद्यानासाठी आरक्षित करण्यात आली. मूळ जमीन मालक जीवन जहागीरदार यांच्याकडून मनपाने भूसंपादनही करून घेतले. या जागेवर मनपाने ताबा घेतला नाही. नागरिकांनी मोकळी जागा बघून अतिक्रमण करून टाकले. ज्या उद्देशासाठी महापालिकेने जागा घेतली तो उद्देश सफल होत नसल्याची तक्रार जहागीरदार यांनी खंडपीठात केली.याचिकेमुळे (क्र. ११४३४ /२०१४) मनपा संकटात सापडली. उद्यानाच्या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने सुरू केली. जागेवर काही कच्चे व दोन मोठ्या इमारती आहेत. एक छोटेसे धार्मिकस्थळही बांधण्यात आले. बुधवार ११ जानेवारी रोजी घटनास्थळावर मनपाचे अतिक्रमण हटाव पथक गेल्यावर एमआयएम नगरसेवक विकास एडके यांनी कडाडून विरोध दर्शविला.शिष्टमंडळासह नंतर ते मनपा आयुक्तांकडे केले. आयुक्तांनी हे प्रकरण खूप गंभीर आहे. न्यायालयात अवमान याचिका दाखल असल्याचे त्यांना सांगितले. धार्मिकस्थळ वाचविण्यासाठी एमआयएमच्या २५ नगरसेवकांचे पद गेले तरी चालेल, अशी भाषा एडके यांनी केलीहोती.शुक्रवारी महापालिकेने उद्यानाच्या जागेवरील नऊ अतिक्रमणे काढली. आणखी काही अतिक्रमणे बाकी आहेत. या प्रकरणात एडके यांनी कारवाईत अडसर आणला म्हणून मनपा आयुक्त मुगळीकर यांनी त्यांना अपात्रतेसंदर्भात नोटीस दिली. नोटीसचे उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असेही आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.एमआयएमवर संकट गडदमनपा सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी एमआयएमचे सय्यद मतीन, शेख जफर, अब्दुल अजीम यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. दमडी महल येथील अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते फेरोज खान, गटनेते नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, सरवत बेगम, सईदा फारुकी यांचे नगरसेवकपद रद्द करावे असा ठराव सर्वसाधारण सभेने घेतला आहे. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून फेरोज खान यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे.