शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

औरंगाबाद महापालिका निवडणूक रणसंग्राम: विशिष्ट राजकारण्यांसाठी प्रभाग होणार नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 7:30 PM

Aurangabad Municipal Corporation Election: राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे.

ठळक मुद्देमनपा प्रशासकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेला नवीन प्रभागरचना तयार करण्याची कवायत सुरू करावी लागणार आहे. त्याची रंगीत तालीम करण्यापूर्वी बुधवारी मनपा ( Aurangabad Municipal Corporation Election) प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली. प्रभाग तयार करताना २०११च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेले प्रगणक गट (ईबी) जशास तसे ठेवण्यावर मनपा अधिकाऱ्यांचा कल राहील. विशिष्ट राजकीय मंडळींना डोळ्यासमोर ठेवून प्रभाग तयार केले जाणार नाहीत.

राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला तीन सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करून ठेवणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी अंतिम आराखडा तयार करतील. औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्डरचनेचा आणि आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ही याचिका निकाली निघाली तरच पुढील वाटचाल सोपी होणार आहे. त्यापूर्वी महापालिका आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहे. बुधवारी प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी मनपा प्रशासक यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. या बैठकीत कच्चा आराखडा तयार करण्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. झोन कार्यालयात नियुक्त नगररचना विभागाचे अभियंते, इतर विभागाचे अभियंते, कर्मचारी यांच्यावर प्रभागनिहाय कच्चे नकाशे तयार करण्याची जबाबदारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासनाचा सावध पवित्राआता प्रभागरचना करताना तीन वॉर्डांची जुळवाजुळव करताना प्रगणक गट विचारात घ्यावे लागणार आहेत. प्रगणक गट फोडता येणार नाहीत किंवा जवळचे वॉर्ड सोडून इतर वॉर्डालाही गट जोडता येणार नाहीत. वॉर्डाच्या सीमारेषा तयार करताना प्रगणक गटाचा विचार करूनच नकाशाचे काम करावे लागणार आहे. झोन कार्यालयांतर्गत असलेले वॉर्ड एकत्र करून त्यांचे प्रभाग तयार केले जाणार आहेत. तीन वॉर्डांचा एक प्रभाग बनवला जाणार असल्यामुळे वॉर्डांच्या सीमा मोठ्या प्रमाणात बदलल्या जाण्याची शक्यता आहे. प्रगणक गटांची अदलाबदल करायची झाल्यास वॉर्ड आणि प्रभाग सोडून करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या जवळपास सारखी राहण्याची शक्यता आहे.

प्रगणक गट म्हणजे काय?महापालिकेची निवडणूक २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावर होणार आहे. जनगणना करताना प्रत्येक वॉर्डात १ हजार नागरिकांचा एक ‘प्रगणक गट’ तयार करण्यात आला. प्रत्येक प्रगणक गटाला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येतो. त्यानुसार त्या प्रगणक गटाची ओळख असते. वॉर्डातील लोकसंख्या ठरविताना हे प्रगणक गट उपयोगात आणले जातात.

सोयीच्या प्रभागासाठी इच्छुकांची कसरत; महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करणार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक