औरंगाबाद : सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत मागील काही महिन्यांपासून जेमतेम पाणी पडत होते. त्यामुळे या भागातील तब्बल ४० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक पाण्याच्या टाकीवर आता मी स्वत: जाऊन पाहणी करणार, अशी घोषणा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी केली. त्यामुळे सोमवारी रात्री सिडकोतील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने तुडुंब भरली. मंगळवारी दिवसभर विविध वॉर्डांना समाधानकारक पाणीही मिळाले. नेहमी टाकीतील पाण्याची पातळी ४ मीटरपर्यंत असायची. मंगळवारी सकाळी तब्बल साडेसात मीटर पाण्याची पातळी होती.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी खरोखरच चमत्कारी असल्याची प्रचीती सिडको-हडकोतील नागरिकांना झाली. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर अनेक नगरसेवकांनी पाणी पडत नाही, म्हणून आंदोलने केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर याचा किंचितही फरक पडला नाही. १० ते १२ एमएलडीपेक्षा जास्त पाणी २४ तासांत पडतच नव्हते. नक्षत्रवाडीहून ३२ एमएलडी पाणी आजही सिडको-हडकोसाठी देण्यात येते. रस्त्यात तब्बल २० ते २२ एमएलडी पाणी गायब होते. एक्स्प्रेस जलवाहिनीतून काही वॉर्डांना थेट पाणी देण्यात येते. दररोज पाणी मिळत असल्याने संबंधित नागरिक, नगरसेवक चिडीचूप आहेत. फक्त हे पाणी बंद होता कामा नये यावरच लक्ष ठेवण्यात येते. राजकीय दबावापोटी मनपा कर्मचारीही एक्स्प्रेस लाईनवर ठिकठिकाणी असलेले व्हॉल्व्ह बंद करीत नाहीत.सोमवारी दुपारी आ. अतुल सावे, किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजप नगरसेवकांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची भेट घेतली होती. या भेटीत सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत पाणीच पडत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. आयुक्तांनीही पाणीपुरवठा विभागाला योग्य त्या सूचना देत मी स्वत: पाण्याच्या टाक्यांना न सांगता भेट देणार असल्याचे सांगितले होते. मंगळवारी आयुक्त एकाही पाण्याच्या टाकीवर गेले नाहीत. मात्र, रात्रीतून सिडको एन-५ येथील पाण्याची टाकी तुडुंब भरली. सकाळी ६ वाजता पाण्याची पातळी तब्बल साडेसात मीटरपर्यंत पोहोचली होती. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करायचा होता त्यांना समाधानकारक पाणी देण्यात आले.भाजपने थांबविला पाणीपुरवठासिडको एन-५ येथील पाण्याची टाकी सकाळी ६ वाजता पूर्ण क्षमतेने भरली. यापूर्वी ४ मीटरपेक्षा जास्त पाणी पातळी जातच नव्हती. सकाळी ६ वाजता जालना रोडवरील विविध वसाहतींना पाणी द्यायचे होते. सिडको एन-२, एन-३ भागात पाणी द्यायचे होते. याचवेळी भाजपतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाणी सोडले तर नागरिक कार्यक्रमाला येणार नाहीत, या भीतीपोटी भाजपच्या मंडळींनी मनपा कर्मचाºयांना सांगून पाणीपुरवठ्याची वेळ बदलली. सकाळी ६ वाजता होणारा पाणीपुरवठा नंतर ९ वाजेपासून सुरू करण्यात आला.पाणीपुरवठा समाधानकारकवॉर्ड क्र. ४० गणेशनगर येथे रविवारी पाणी देण्यात आले. आता या भागाला गुरुवारी पाणी मिळणार आहे. वॉर्ड क्र. ६४ गुलमोहर कॉलनीला शुक्रवारी पाणी मिळाले. बुधवारी पाणीपुरवठा होणार आहे. एन-२ ठाकरेनगर भागात मंगळवारी पाणी देण्यात आले. जाधववाडी भागात सोमवारी अल्प दाबाने पाणी मिळाले. रामनगर भागात रविवारी कमी दाबाने पाणी देण्यात आले. गुरुवारी परत पाणी देण्यात येईल. आंबेडकरनगर येथे सोमवारी पाणी देण्यात आले. काही गल्ल्यांमध्ये कमी दाबाने पाणी देण्यात आले.
औरंगाबाद महापालिकेत जादूचे प्रयोग, आयुक्त भेटीच्या धमकीने भरला जलकुंभ ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:14 AM
सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीत मागील काही महिन्यांपासून जेमतेम पाणी पडत होते. त्यामुळे या भागातील तब्बल ४० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.
ठळक मुद्देआयुक्तांची धास्ती : अनेक महिन्यांनंतर साडेसात मीटरची उंची गाठली