शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

औरंगाबाद मनपा शाळा गुणवत्तेत ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 7:41 PM

महापालिका शाळांना लागूनच खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपाच्या शाळा आता तग धरायला तयार नाहीत. चार शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : महापालिका शाळांना लागूनच खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपाच्या शाळा आता तग धरायला तयार नाहीत. चार शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार आहेत. उस्मानपुरा, विष्णूनगर, हनुमाननगर, एन-७ येथील चार शाळांचा यामध्ये समावेश आहे. 

मागील काही वर्षांपासून महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. विद्यार्थी संख्या कशी वाढेल यादृष्टीने प्रशासन, सत्ताधाºयांकडून कधीच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. शहरातील अनेक खाजगी शाळा आजही विविध वसाहतींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा शोध घेतात. आमच्याच शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून पालकांना साकडे घालतात. महापालिकेचे शिक्षक कधीच असे प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे शहरातील चार शाळा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. 

शहरात मनपाच्या ७१ शाळा आहेत. मनपा शाळांमधील असुविधा, गुणवत्ता यामुळे अनेक पालक प्रवेश घेण्यास नकार देतात. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपा शाळा अजिबात तग धरायला तयार नाहीत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात तर काही शाळांमधील संख्या पन्नासच्याही आत आली आहे. यात उस्मानपुरा, विष्णूनगर, हनुमाननगर आणि सिडको एन-७ या शाळांचा समावेश  आहे. 

या शाळा बंद करण्याचा विचार मनपाच्या शिक्षण विभागाकडून सुरू आहे. या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना मनपाच्या दुसºया शाळांमध्ये सामावून घ्यावे, असा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून बनविण्यात येत आहे. या निर्णयास अजून पदाधिकारी आणि आयुक्तांनी मंजुरी दिलेली नाही. सिडको एन-७ येथील शाळेची इमारत एका खाजगी संस्थेला शाळाच चालविण्यासाठी देण्याचा पराक्रमही मनपाने केला आहे, हे विशेष. 

घटती विद्यार्थी संख्या दहा वर्षांपूर्वी मनपाच्या शाळांमध्ये २५ हजारांहून अधिक विद्यार्थी होते. दरवर्षी विद्यार्थी संख्येला मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. या गळतीकडे प्रशासन अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. सध्या ७१ शाळांमध्ये फक्त १७ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नारेगाव, किराडपुरा, प्रियदर्शिनीनगर, मिटमिटा येथील मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या आवश्यकतेपेक्षाही जास्त आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा