शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

निलंबनाच्या भीतीने महापालिकेची यंत्रणा अखेर लागली कामाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:56 PM

शहरातील छोटी-छोटी कामे होण्यास सुरुवात

ठळक मुद्देकालपर्यंत शहरात महापालिका आहे किंवा नाही, अशी परिस्थिती होती.

औरंगाबाद : ड्रेनेज चोकअप झाल्यानंतर दूषित पाणी अनेक दिवस रस्त्याने वाहू लागले तरी मनपाची यंत्रणा त्याकडे लक्ष देत नव्हती. पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हमधून वर्षानुवर्षे पाणी वाहत होते तरी मनपाची यंत्रणा निद्रिस्तच होती. साफसफाईकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत होते. सफाई कामगार शहरात आहेत किंवा नाही, अशी परिस्थिती होती. मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार घेतल्यापासून यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापुढे फक्त काम म्हणजे कामच करावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. काम करायचे नसेल तर निलंबनास सामोरे जावे लागेल, असेही सांगितले आहे. त्यामुळे मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे.

कालपर्यंत शहरात महापालिका आहे किंवा नाही, अशी परिस्थिती होती. वॉर्ड कार्यालयांकडून जी कामे अपेक्षित होती ती अजिबात होत नव्हती. जिथेतिथे ड्रेनेजचे पाणी वाहणे, चार ते पाच दिवस कचराच न उचलणे, दुभाजकातील झाडे वाढली तरी त्याकडे दुर्लक्ष, दुभाजकाच्या बाजूला वर्षानुवर्षे माती पडून राहणे, फुटपाथवर गवत वाढले तरी सफाई कामगारांकडून लक्ष न देणे, पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हमधून वर्षानुवर्षे पाणी वाहत राहणे. मनपाच्या ताब्यात असलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष, अशी अनेक काम प्रलंबित राहत होती. मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार घेतला त्याच दिवशी कॅरिबॅगच्या मुद्यावरून आपल्याच अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दंड लावला. 

दुसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधींना पाचशे रुपये दंड लावला. त्यानंतर आयुक्तांनी वॉर्डनिहाय दौरा सुरू केला. दौऱ्यात शेकडो मालमत्तांना कर लागलेला नाही, व्यावसायिक मालमत्तेला घरगुती कर, अनधिकृत नळ, नाल्यांमध्ये कचरा, असे विदारक चित्र ठिकठिकाणी दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापुढे फक्त कामच करावे लागेल, अशी सक्त ताकीद दिली. त्यामुळे वॉर्ड कार्यालयांसह मनपा मुख्यालयातील यंत्रणा चांगलीच कामाला लागली. वॉर्डातील स्वच्छता पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे. व्हॉल्व्हमधील गळत्या बंद करण्याचे काम सुरू झाले. दुभाजकातील झाडांना आकार देणे, माती उचलणे, दुभाजक तुटलेले असतील, तर दुरुस्ती, पॅचवर्क आदी कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत.

वसुली अचानक वाढलीआयुक्त रुजू होण्यापूर्वी मालमत्ता कराची वसुली नऊ झोनमध्ये दिवसभरात १० ते १५ लाख रुपये होती. आता हे प्रमाण ६० लाखांहून अधिक झाले आहे. दोन आठवड्यांत मालमत्ता करापोटी तिजोरीत ८ कोटींहून अधिक रक्कम आली आहे. ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के वसुली हवी, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

अतिक्रमण हटाव विभाग कामाला लागलावर्षभरात सोयीनुसार आठ ते दहा ठिकाणीच अतिक्रमण हटाव विभाग कारवाई करीत होता. आयुक्त पाण्डेय आल्यानंतर अतिक्रमण हटाव विभाग एक दिवसही थांबला नाही. सतत कुठे ना कुठे कारवाई सुरूच आहे. सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या तक्रारींकडे हा विभाग दुर्लक्ष करीत असे. 

आयुक्तांचे काम बरे सुरू आहेनवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांचे काम दररोज वर्तमानपत्रात वाचायला मिळते. काम पाहून बरे चालले आहे, असे दिसून येते. चांगले प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. - कृष्णा भोगे, माजी सनदी अधिकारी.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरAurangabadऔरंगाबाद