शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

औरंगाबादचा जगात गाजावाजा, स्टार्टअपसाठी पोषक जगातील पहिल्या हजार शहरात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 1:44 PM

Aurangabad Is Heaven for Startups : स्टार्टअप ब्लिंक’ने नुकताच ‘स्टार्टअप इकोसिस्टीम वर्ल्ड रँकिंग २०२१’ हा अहवाल जाहीर केला असून जगातील पहिल्या एक हजार शहरांमध्ये औरंगाबादसह विषाखापट्टनम, विजयवाडा, रायपूर, पाटणा, वाराणसी, जमशेदपूर, उडपी या शहरांचा नव्यानेच समावेश झाला आहे.

ठळक मुद्देदहाव्या क्रमांकावर बंगळुरू, १४ व्या क्रमांकावर नवी दिल्ली, १६ व्या क्रमांकावर मुंंबईचा क्रमांकऔरंगाबाद शहर मागील काही वर्षांत शैक्षणिक आणि औद्योगिक हब म्हणून पुढे आले आहे.

औरंगाबाद : स्टार्टअपसाठी सर्वोत्तम वातावरण असलेल्या जगातील शहरांची क्रमवारी ‘स्टार्टअप ब्लिंक’ने जाहीर केली असून जगातील पहिल्या हजार शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश असून हे शहर ८८५व्या क्रमांकावर आहे. या यादीत औरंगाबाद हे देशात ३६व्या, तर दक्षिण आशियामध्ये ४२व्या क्रमांकावर आहे. स्टार्टअप ब्लिंक ही संस्था जागतिक स्टार्टअप इकोसिस्टीमविषयी माहिती संकलित करून दरवर्षी त्याबाबतचा अहवाल सादर करते. ‘स्टार्टअप ब्लिंक’ने नुकताच ‘स्टार्टअप इकोसिस्टीम वर्ल्ड रँकिंग २०२१’ हा अहवाल जाहीर केला असून जगातील पहिल्या एक हजार शहरांमध्ये औरंगाबादसह विषाखापट्टनम, विजयवाडा, रायपूर, पाटणा, वाराणसी, जमशेदपूर, उडपी या शहरांचा नव्यानेच समावेश झाला आहे. या यादीत दहाव्या क्रमांकावर बंगळुरू, १४ व्या क्रमांकावर नवी दिल्ली, १६ व्या क्रमांकावर मुंंबईचा क्रमांक आहे. ( Aurangabad is one of the first thousand cities in the world to be a haven good environment for startups ) 

या अहवालात तीन पॅरॅमीटर्ससाठी गुणांकन देण्यात आले आहेत. यामध्ये मात्रा, गुणवत्ता आणि व्यवसाय वातावरण अशा तीन मापदंडांची बेरीज केली जाते. औरंगाबाद शहर मागील काही वर्षांत शैक्षणिक आणि औद्योगिक हब म्हणून पुढे आले आहे. स्थानिक औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून ‘मॅजिक’सारखी संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पुढाकाराने औरंगाबादेत इन्क्युबेशन सेंटर्सची उभारणी झाली आहे. यांच्या मदतीनेच औरंगाबादेत स्टार्टअप्स पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.

जगात पहिल्या हजार शहरांच्या यादीत औरंगाबादचे नाव येण्यासाठी मागील दहा वर्षांपूर्वीचे परिश्रम आहेत. प्रसाद कोकीळ आणि प्रशांत देशपांडे यांनी ‘सीएमआयए’च्या माध्यमातून सन २०१० मध्ये पहिल्यांदा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट समिट आयोजित करण्यात आली होती. त्यात मुलांना उद्योजकतेला (इंटरप्रिनरशिप) घाबरून न जाता त्याचा आनंद घ्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सन २०१६ पासून ‘मॅजिक’ या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ‘सीएमआयए’चे तत्कालीन अध्यक्ष आशिष गर्दे व कोकीळ यांनी परिश्रम घेतले. ते प्रत्येक नावीन्यपूर्ण प्रयोग, आयडिया जोडत गेले. त्यानंतर येथे अस्तित्वात आलेल्या इन्क्युबेशन सेंटरला ‘मॅजिकच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळाले. हळूहळू कॉलेजमध्ये गुण मिळविण्यासाठी तयार होणारे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट प्रश्न सोडविणारे होत गेले. प्रश्न सोडविणारे हे प्रोजेक्ट प्रॉडक्टमध्ये रूपांतरित होत गेले. प्रॉडक्टमध्ये रूपांतरित हे प्रोजेक्ट पुढे स्टार्टअप्‌मध्ये रजिस्टर होत गेले. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मॅजिकसह दोन इन्क्युबेशन सेंटर्स सहकार्य करीत आहेत. त्यामुळे स्टार्टअप्‌ला औरंगाबादेत पोषक वातावरण व बळ मिळत गेले.

दहा वर्षांची तपश्चर्या फळालास्टार्टअप्‌च्या वाढीसाठी जगाच्या यादीत औरंगाबादचे नाव झळकले, यामागे मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिलची (मॅजिक) मागील दहा वर्षांची तपश्चर्या असून ‘मॅजिक’च्या सामूहिक प्रयत्नाचे हे फळ आहे. ‘सीएमआयए’चे ‘मॅजिक’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अशी तीन इन्क्युबेशन सेंटर्स सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या माध्यमातून नावीन्यपूर्ण उद्योगाला चालना मिळाली. औरंगाबादेतील स्टार्टअप्‌च्या या लौकिकामुळे नकळत भारत सरकारच्या स्टार्टअप् इंडियाला देखील मोठा पाठिंबा मिळाला आहे.- प्रकाश कोकीळ, मराठवाडा उपाध्यक्ष, सीआयआय

शहराच्या भरभराटीसाठी चांगली बातमीस्टार्टअप्‌साठी ही आनंदाची बातमी आहे. येथील ऑटोमोबाईल, फार्मा आणि मॅन्युफॅक्चरिंग या उद्योगांमुळे औरंगाबादेत स्टार्टअप्‌ला पोषक वातावरण आहे. आपल्याकडे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, आवश्यक जागा, पाठिंबा व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. येथे आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्‌ मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे, ही या शहराच्या भरभराटीसाठी चांगली गोष्ट आहे. कोरोनानंतर विदेशात जाऊन नोकरी - धंदा करण्यापेक्षा औरंगाबादेत स्टार्टअप्‌ सुरू करण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.- रोहित दाशरथी, तरुण उद्योजक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीbusinessव्यवसाय