औरंगाबाद : गेल्या चार दिवसांपासून औरंगाबादकरांना अभूतपूर्व खरेदीचा आनंद लुटण्याची संधी देणाºया ‘लोकमत महाएक्स्पो’ या महाप्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. शॉपिंग उत्सव, इलेक्ट्रो एक्स्पो, आॅटो एक्स्पो, फर्निचर व इंटेरिअर एक्स्पो आणि प्रॉपर्टी शो, अशा पाच प्रकारचे प्रदर्शन ‘लोकमत’ने एकाच छताखाली आयोजित केले होते. एसएफएस शाळेच्या मैदानावर आयोजित या महाप्रदर्शनाला हजारो ग्राहकांनी भेट देऊन मनसोक्त खरेदी केली.शहरातील नामांकित बिल्डर्स आणि वाहनाच्या शोरूमच्या स्टॉल्सने प्रदर्शनात सर्वाधिक गर्दी खेचली. आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न घेऊन आलेल्या ग्राहकांसाठी बिल्डर्सतर्फे आकर्षक सवलतही देण्यात आली होती. त्यामुळे घर खरेदीची मोठी उलाढाल या महाएक्स्पोमध्ये झाली. शहरासह परिसरात सुरू असलेल्या गृहप्रकल्पांची माहिती, विक्री, बुकिंग करण्यासाठी लोकांनी प्रॉपर्टी शोमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावली.तरुणांमध्ये ‘आॅटो एक्स्पो’चे जबरदस्त आकर्षण दिसून आले. चारचाकी आणि दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांच्या डीलर्सच्या स्वतंत्र दालनांत नामांकित ब्रँडस्च्या बाईक्स, मोपेड, कार, जीप येथे उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी सोय झाली. व्यावसायिक वाहनांनादेखील मोठी मागणी दिसली. अगदी तेरा हजारांपासून काही लाखांपर्यंतच्या विदेशी सायकली प्रमुख आकर्षण ठरल्या.इलेक्ट्रॉनिक वस्तंूच्या प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये एलईडी टीव्ही, घरगुती गिरणी, सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे आदींना ग्राहकांची पसंती मिळाली. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. तसेच फर्निचर व इंटेरिअर एक्स्पोमध्ये गृहसजावटीच्या अद्ययावत वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सोफासेट, टेबल्स, खुर्च्या, कपाटे आदींचा समावेश होता.शॉपिंग उत्सवामध्ये ब्रँडेड वस्तूंपासून बचत गटांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तूंपर्यंत सर्व काही विक्रीला होते. येथे महिलांची मोठी गर्दी झाली. महिलांकरितावस्त्र, दैनंदिन वापरातील वस्तू, लोणचे, पापड, चटण्या असे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. सौंदर्य प्रसाधनांची मोठी रेंजदेखील येथे होती.वेळ आणि पैशांची बचत, या दोन गोष्टींमुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. लोकमत महाएक्स्पोच्या निमित्ताने हजारो कुटुंबांनी सहकुटुंब खरेदी करण्याचा आनंद लुटला.सर्वसमावेशक प्रदर्शनसुनील देवरे यांनी तयार केलेल्या दहा मूर्ती ग्राहकांसाठी सेल्फीचे आकर्षण केंद्र बनल्या होत्या. संभाजी महाराज, सिंह, संत ज्ञानेश्वर, गौतम बुद्ध, सरस्वती, थिंकिंग मॅन, या मूर्तींसमोर लोक सेल्फी घेत होते. ग्राहकांनी खरेदीबरोबरच फूड झोनमध्ये चवदार खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला.लहान मुलांनी किडस् झोनमध्ये धमाल केली. ग्राहकांच्या सर्व गरजांना लक्षात घेऊन आयोजन करण्यात आलेले हे सर्वसमावेशक भव्य प्रदर्शन आहे, अशी प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाºया लोकांनी व्यक्त केली.
औरंगाबाद : उदंड प्रतिसादात ‘लोकमत महाएक्स्पो’ची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:02 AM