लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात आले असून ‘भारतमाला’ परियोजनेतूनच या रस्त्याचे काम होणार असल्याचे एनएचएआयच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पुढच्या महिन्यात पूर्ण रस्त्याचे अलायमेंट ठरेल. त्यानंतर गावे, नकाशे तयार होतील. सध्या तरी शहराला पाणीपुरवठा करणारी मनपाची जलवाहिनी रुंदीकरणात अडसर ठरते आहे.डीपीआरचे काम करणाºया एजन्सीने अलायमेंटबाबतचा प्राथमिक अहवाल दिला आहे. औरंगाबाद ते पैठण हा रस्ता एनएच क्रमांक २११ लगतच असणार आहे. शेंद्रा ते बिडकीन ते वाळूज असा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ४५ कि़मी.पैकी अर्धा रस्ता रिंगरोडदेखील गणला जाईल.डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या ‘इंडस्ट्री ट्रँगल’ साठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा प्रस्ताव नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ९०० कोटींचा हा प्रकल्प औरंगाबाद ते पैठण मार्गे शेवगाव या रस्त्यासह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही वेगवेगळे रस्ते असताना त्यांचा संयुक्त प्रस्ताव तयार डीपीआर तयार होत आहे. ९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीन मार्ग वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित आहे. शिवाय औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचे देखील यात समायोजन झाले आहे. त्यासाठी भूसंपादनासह १ हजार कोटी लागण्याचा अंदाज आहे. सध्या ३० मीटर रुंद तो रस्ता आहे. ३० मीटर नव्याने भूसंपादन केल्यास तो रस्ता नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या निकषाप्रमाणे पूर्ण करता येईल. १९० किलोमीटरच्या कामाला १९०० कोटी रुपये भूसंपादनासह लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे.जालना रोड, बीड बायपास या दोन्ही रस्त्यांची कामे होतील, असा दावा एनएचएआयचे मावळते प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी केला. या प्रकल्पाच्या निविदा अद्याप निघाल्या नाहीत. यावर घोटकर म्हणाले, दिल्ली मुख्यालयात याबाबत हालचाली सुरू आहेत. पैठण ते औरंगाबाद डीपीआरचे काम सुरू झाले आहे. सोलापूर ते धुळे या हायवेच्या कामाला गती मिळालेली आहे. जून २०१८ पर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण खुला होईल, असा दावा त्यांनी केला.
औरंगाबाद ते पैठण रस्ता ‘भारतमाला’ योजनेतूनच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:48 AM