औरंगाबाद : औरंगाबाद पंचायत समिती राखण्यात काँग्रेस आघाडीने यश मिळविले. काँग्रेसचे पळशी गणातील सुनील मोतीलाल हरणे हे सभापतीपदी, तर गाढेजळगाव गणातील अपक्ष सदस्य गयाबाई शंकर ठोंबरे या उपसभापतीपदी विराजमान झाल्या. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी युतीच्या दोन्ही पदांच्या उमेदवारांचा १० विरुद्ध ७, असा पराभव केला. सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी रविवारी (दि.१४) पंचायत समितीच्या चेलीपुरा येथील कार्यालयात पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. त्यात काँग्रेसचे सभापतीपदाचे उमेदवार सुनील हरणे यांनी शिवसेनेचे गणेश कडुबा नवले यांचा पराभव केला. हरणे यांना १०, तर नवले यांना ७ मते मिळाली. उपसभापतीपदी काँॅग्रेस आघाडीच्या गयाबाई ठोंबरे यांनी भाजपाचे बळीराम रामहरी गावंडे यांचा पराभव केला. ठोंबरे यांना १० तर गावंडे यांना ७ मते मिळाली. सभापतीपद या वेळेस सर्वसाधारण गटासाठी खुले आहे. पीठासीन अधिकारी थोरात यांनी सांगितले की, सभापतीपदासाठी सुनील हरणे, मनोहर पतिंगराव शेजूळ, गजानन नारायण मते, गणेश नवले, राधाबाई गणेश घोरपडे या पाच सदस्यांनी नामनिर्देशनपत्रे सादर केली होती. त्यानंतर शेजूळ, मते व घोरपडे या तिघांनी माघार घेतली. उपसभापतीपदासाठी बळीराम गावंडे, गयाबाई ठोंबरे व रुकसानाबी जब्बार खान यांनी नामनिर्देशनपत्रे सादर केली होती.तालुकासभापतीउपसभापतीऔरंगाबादसुनील हरणे (काँग्रेस)गयाबाई ठोंबरे (अपक्ष)सिल्लोडलताबाई वानखेडे (राष्ट्रवादी)इद्रीस मुल्तानी (भाजपा)पैठणपुष्पा रामनाथ केदारे (मनसे)कृष्णा गिधाने (मनसे)खुलताबादफरजाना पटेल (काँग्रेस)दिनेश अंभोरे (अपक्ष)फुलंब्रीमाधुरी गाडेकर (राष्ट्रवादी)रऊफ कुरेशी (काँग्रेस)कन्नडखेमा धर्मू मधे (मनसे)प्रकाश गाडेकर (राष्ट्रवादी)सोयगावनंदा आगे (काँग्रेस)चंद्रकांत पाटील (राष्ट्रवादी)गंगापूरसंजय जैस्वाल (शिवसेना)वर्षा गंडे (शिवसेना)वैजापूरद्वारका पवार (राष्ट्रवादी)सुभाष जाधव (राष्ट्रवादी)
औरंगाबाद पंचायत समिती काँग्रेस आघाडीने राखली
By admin | Published: September 15, 2014 12:37 AM