औरंगाबाद : समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आज सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. सभेने हा प्रस्ताव मंजूर करताना १४ विविध अटी-शर्थी टाकल्या आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने २८९ कोटी रुपये द्यावे असा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे.
शहरासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनी योजनेबद्दल २७ ऑगस्टला सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. यात योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला २८९ कोटी रुपये देण्याची लेखी हमी द्यावी. मुख्यमंत्र्यांनी हमी दिल्यावर औरंगाबाद वॉटर युटिलिटीचा प्रस्ताव ४ सप्टेंबरला मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती.
आज झालेल्या सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली असून. सभेने हा प्रस्ताव मंजूर करताना औरंगाबाद वॉटर युटिलिटीला कंपनी समोर १४ विविध अटी शर्थी टाकल्या आहेत. तसेच योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने २८९ कोटी रुपये द्यावे असा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे.