शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

औरंगाबाद पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 2:08 PM

शाळा-महाविद्यालयीन मुली, महिलांची छेड काढणारे आणि पोलिसांच्या पारदर्शक व्यवहाराचे आता थेट चित्रीकरणच होणार असून, त्यासाठी शहर पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे बसविले जात आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात  खरेदी करण्यात आलेले २४ कॅमेरे वाहतूक पोलीस, दामिनी पथकांसोबतच पोलीस ठाण्यातील निवडक पोलिसांना देण्यात आले.

औरंगाबाद : शाळा-महाविद्यालयीन मुली, महिलांची छेड काढणारे आणि पोलिसांच्या पारदर्शक व्यवहाराचे आता थेट चित्रीकरणच होणार असून, त्यासाठी शहर पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे बसविले जात आहे. पहिल्या टप्प्यात  खरेदी करण्यात आलेले २४ कॅमेरे वाहतूक पोलीस, दामिनी पथकांसोबतच पोलीस ठाण्यातील निवडक पोलिसांना देण्यात आले.

पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी येथे रुजू झाल्यानंतर महिला सुरक्षा आणि पोलिसांच्या पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले. शाळा-महाविद्यालये आता सुरू झाली आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन मुलींची छेड काढणारे काही टोळके जागोजागी बसलेले असतात. अशांवर कारवाई करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्तीवर असतात. त्यांना कारवाईसाठी हे कॅमेरे दिले आहेत. यासोबतच नियम मोडून वाहने पळविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर पोलीस कारवाईसाठी सरसावतात, अनेकदा वाहनचालक पोलिसांच्या कारवाईला विरोध करतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरतात, बऱ्याचदा पोलिसांना धक्काबुक्कीही केली जाते, अशा घटना आता पोलिसांच्या खांद्यावरील कॅमेऱ्यांत कैद होणार आहेत.

पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरा लावल्याचे समाजकंटकांना समजल्यानंतर ते सुद्धा भीतीपोटी असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत. शिवाय पोलिसांचे काम अत्यंत पारदर्शक असावे, पोलीस घटनास्थळी पोहोचतात, तेव्हा या कॅमेऱ्यातून घटना स्थळाचे, तेथे उपस्थित लोकांचे  शूटिंग होईल, हे छायाचित्रण पुरावा म्हणून पोलिसांना वापरता येईल. सध्या २४ स्पाय कॅमेरे उपलब्ध झाले आहेत. यापैकी सहा कॅमेरे वाहतूक शाखेला देण्यात आले. तसेच उर्वरित कॅमेरे विविध पोलीस ठाण्यांना आणि महिला सुरक्षा पथकांना वाटप करण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यांतर्गत प्राप्त कॅमेऱ्यांचा परिणाम दिसल्यानंतर आणखी कॅमेरे मागविण्यात येणार आहेत.  

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद