शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Aurangabad Violence : औरंगाबादमधील दंगलीने कोट्यावधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 4:42 AM

गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाइल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री शहरात जातीय दंगलच पेटली.

औरंगाबाद : येथील गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाइल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री शहरात जातीय दंगलच पेटली. मध्यरात्री सुरू झालेली जाळपोळ, दगडफेकीसह लुटालुटीच्या घटना शनिवारी दुपारपर्यंत सुरूच होत्या. हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळासाठी मोबाइलची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

पोलिसांनी सुमारे ५० ते ६० जणांना ताब्यात घेतले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून जमावबंदी आहे. समाजकंटकांनी लावलेल्या आगीत जगनलाल छगनलाल बन्सिले (७२) यांचा होरपळून मृत्यू झाला, तर हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अब्दुल हॅरिस अब्दुल हरुन कादरी (१७) हा युवक ठार झाला. हिंसाचारात २५० हून अधिक जण जखमी झाले. जमावांने शेकडो दुकाने, चारचाकी व दुचाकी वाहने पेटवली. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गांधीनगरात शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गॅरेजमध्ये बसलेल्या चार जणांनी एका तरुणाचा मोबाइल घेतला होता. तो परत मागण्यासाठीगेलेल्या तरुणाला मारहाण करून हाकलून देण्यात आले. त्यानंतर तो तरुण त्याच्या साथीदारांना घेऊन आला. त्यातून दोन गट भिडले आणि दगडफेक, जाळपोळीच्या घटनांना सुरुवात झाली. गांधीनगर रस्त्यावरील कूलर मार्केटमधील दुकानांची आणि वाहनांची जमावाने तोडफोड करण्यास सुरुवातकेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांचे पथक व शीघ्र कृती दल तातडीने घटनास्थळी आले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद