शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

पोलिसांचा वचक आणि सतर्क नागरिकांमुळे महिलांसाठी औरंगाबाद सुरक्षित शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 8:01 PM

रात्री, बेरात्री एकटी महिला, तरुणी कोठेही फिरू शकते

ठळक मुद्देपोलिसांच्या विविध उपाययोजनाप्रभावी दामिनी पथक

- बापू सोळुंके

औरंगाबाद : राजकीय, सामाजिक चळवळीचे प्रमुख केंद्र बनलेले औरंगाबाद  महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी हेल्पलाईन नंबर, व्हॉटस्अप नंबर उपलब्ध केले. एवढेच नव्हे, तर दामिनी पथक सतत महाविद्यालयात आणि मुलींच्या वसतिगृहात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधते. यामुळे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी एकट्या राहणाऱ्या महिला, मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते.

औद्योगिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराचा चोहोबाजूने झपाट्याने विस्तार होत आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी बाहेरगावहून येथे येऊन एकटीने राहणाऱ्या महिला कामगार आणि विद्यार्थिनींची संख्या एक लाखाहून अधिक आहे. यातील काही जणी खोली किरायाने घेऊन राहतात, तर काही महिला, मुली वसतिगृहात राहतात. एकटीने राहणाऱ्या महिला, तरुणींना त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता वाटू नये याकरिता शहर पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. वसतिगृहातील प्रत्येक मुलीकडे पोलीस नियंत्रण कक्ष, दामिनी पथक आणि पोलिसांच्या हेल्पलाईनचे मोबाईल नंबर आहेत.

बाहेरगावाहून रात्री उशिरा बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे आल्यानंतर घरी जाण्यासाठी मदत हवी असेल तर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यास पोलीस त्यांच्या वाहनातून महिला, तरुणीला घरी नेऊन सोडतात. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पोलीस उपस्थित असतात. रेल्वेस्टेशन, महावीर चौक, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, हर्सूल टी-पॉइंट आदी  महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरेही सुरक्षा कवच म्हणून काम करतात. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होत आहे.

प्रभावी दामिनी पथकमहिलांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी प्रत्येक ठाण्यांतर्गत महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतो. यामुळे तक्रारदार महिला त्यांना नि:संकोचपणे तक्रार सांगू शकते.  दामिनी पथक नियमितपणे शहरातील विविध महाविद्यालये, मुलींच्या वसतिगृहात जाऊन मुलींशी संवाद साधते. त्यांच्याशी कोणीही गैरवर्तन करीत असेल, तर त्यांना थेट लॉकअपमध्ये डांबले जाते. यामुळे दामिनी पथकाने शहरात चांगलाच दबदबा निर्माण केला. या पथकातील उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी त्यांचे मोबाईल आणि व्हॉटस्अप क्रमांक दिले. काही वर्षांपूर्वी निर्जनस्थळी तरुणींवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन बीट हवालदार आणि दामिनी पथक निर्जनस्थळी गस्त घालतात.

कामावर येणे-जाणे सुरक्षितशहरालगतच्या वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीत हजारो महिला कामगार आहेत. यातील अनेक महिला रात्री उशिरा कामावरून घरी परततात. शिवाय शहरात काम करणाऱ्या महिला कामगार, रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका, महिला डॉक्टर रात्री उशिरा कामावर जाऊ शकतात आणि बिनधास्तपणे घरी येऊ शकतात. अनेक विद्यार्थिनी रात्री उशिरापर्यंत अभ्यासिकेत असतात. रात्री उशिरा एकट्या घरी जाताना दिसतात. शहरातील सिनेमाघरात रात्री शेवटचा शो एक  ते दीड वाजता संपतो. सिनेमा पाहून  दुचाकीने अथवा रिक्षाने घरी परतणाऱ्या मुली, महिलांच्या चेहऱ्यांवर घरी पोहोचण्यासंदर्भात कोणतीही साशंकता नसते.

घरात घुसून लुटीची घटना अपवाद१५ दिवसांपूर्वी शास्त्रीनगर येथे एका घरात घुसून वृद्ध मायलेकींना मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. प्राचार्य जीवन देसाई यांच्या घराच्या अंगणात येऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा झाडून कामाला लागली आहे. रस्त्यावर छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसून येते. 

टॅग्स :WomenमहिलाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस