औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील राजेशनगरात सेक्स रॅकेट चालविणारा आरोपी संजय त्र्यंबक कापसेचा देह व्यापाऱ्याच्या ऑनलाईन बाजारातही चांगलाच दबदबा असल्याचे समोर आले. ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या संकेतस्थळावर कापसेचे मोबाईल नंबर पोलिसांना मिळाले. एवढेच नव्हे तर व्हॉटस्अॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींची छायाचित्रे तो ग्राहकांना पाठवून निरोप द्यायचा. त्याचे आणि काही ग्राहकांचे चॅटिंगही पोलिसांच्या हाती लागले.
औरंगाबादेत हायप्रोफाईल कुंटणखान्यावर गुन्हे शाखेचा छापा
राजेशनगरमधील अड्ड्यावर एका मॉलच्या सीईओसह सहायक व्यवस्थापक आणि अन्य दोन ग्राहकांना पकडले होते. तर कोलकाता आणि हैदराबादेतून आणण्यात आलेल्या तरुणींची मुक्तता करण्यात आली होती. हा कुंटणखाना संजय त्र्यंबक कापसे आणि त्याची साथीदार एक आंटी चालवायची. कापसेचे हायप्रोफाईल ग्राहक असायचे. कापसेला यापूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. त्या केसची शनिवारी न्यायालयात तारीख होती. तारखेला हजर राहिल्यानंतर तो सायंकाळी अड्ड्यावर पोहोचला. यानंतर पोलिसांची धाड पडली होती. देशातील विविध शहरात कुंटणखाने चालविणाऱ्या लोकांसोबत त्याची ओळख आहे. या ओळखीतून तो एजंटांच्या माध्यमातून विविध प्रांतांतील तरुणींना देहविक्रय करण्यासाठी औरंगाबादेत आणतो.
राजेशनगर येथील आंटीचे घर हे विरळ लोकवस्तीत आहे. आंटीच्या घराकडे पोलिसांची नजर पडणार नाही, असे गृहीत धरून त्याने अड्डा सुरू केला होता. तेथेच त्याने कोलकाता आणि हैदराबादेतून आणलेल्या तरुणी ठेवल्या होत्या. शिवाय ग्राहकांनाही तो तेथेच बोलवत असे. मागणीनुसार ग्राहकांना विदेशी मद्यही पुरविले जाई. इंटरनेटवर देहविक्रीचे विविध संकेतस्थळे आहेत. यातील काही संकेतस्थळ हे फसवे आहेत तर काही खरे आहेत. कॉलगर्ल पुरविणाऱ्या एका संकेतस्थळावर पोलिसांना दलाल कापसेचा मोबाईल नंबर मिळाला. यावरून सेक्सच्या आॅनलाईन बाजारातही त्याचा धंदा सुरू असल्याचे दिसून येते, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सेक्स रॅकेटमधील आरोपीचे वय लपविले, चेहरेही झाकले
ग्राहकांच्या व्हॉटस्अॅपवर पाठवायचा तरुणींचे छायाचित्रपोलीस क ोठडीतील कापसे आणि आंटीच्या डायरीत आणि मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये खूप लोकांची नावे पोलिसांच्या हाती लागली. कापसे त्याच्या हायप्रोफाईल ग्राहकांच्या व्हॉटस्अॅपवर तरुणींची छायाचित्रे आणि रेट पाठवून बुकिंग करण्यास सांगायचा.
मॉलप्रमुखाचे मित्रासोबत झाले होते चॅटिंगराजेशनगर येथील कुंटणखान्यात पकडलेल्या एका मॉलच्या प्रमुखाने त्याच्या मित्रासोबत केलेले चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले. कुंटणखान्यात जाण्यापूर्वीचे हे चॅटिंग आहे. कुंटणखान्याचा म्होरक्या दलाल संजय कापसेच्या अड्ड्यावर जाण्यासंदर्भात त्यांच्यात चॅटिंग झाली. या चॅटिंगनंतर मॉलप्रमुख त्याचा मित्र व मॉलमधील सहायक व्यवस्थापकाला सोबत घेऊन अड्ड्यावर गेला होता.