सोयगाव (औरंगाबाद): सोयगाव आगारात एसटी कर्मचाऱ्यांनीच लाठ्याकाठ्यानी आगाराच्या प्रवेशद्वारात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी सुरक्षा रक्षकांच्या फिर्यादीवरून पाच एसटी कर्मचाऱ्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयगाव आगारातील या कर्मचाऱ्यांच्या दंगलीत सुरक्षा रक्षक राणीदास सांडू चव्हाण (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून तातडीने उपचारासाठी त्यांना जळगावला रवाना करण्यात आले आहे
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोयगाव आगारच्या प्रवेशद्वारातील सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण हे कर्तव्यावर असताना तीन वाहक (प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे) व दोन चालक (राजू बारी, राजेंद्र भोपे) या पाच जणांनी पहाटे सात वाजताच आगाराकडे येत असताना स्थानक प्रमुख कैलास बागुल यांनी सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण यांना सूचना देऊन या पाच जणांना आगारात प्रवेश देऊ नको अशा सूचना देताच सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण यांनी या पाच जणांना प्रवेशद्वारात रोखले असता या पाचही जणांनी त्याचेवर प्राणघातक हल्ला चढवून चालक रघुनाथ बारी यांनी त्याचे हातातील काठी हिसकावून पाचही जणांनी लाठ्याकाठ्यांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे आगार परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी राणीदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तीन वाहक आणि दोन चालक यांचे विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तातडीने निलंबनाचे आदेशया प्रकरणी सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी तातडीने या दंगल प्रकरणाची माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रक यांना पाठविली असता दुपार पर्यंत या पाचही जणांचे निलंबनाचे आदेश प्राप्त झाल्यावरून आगार प्रमुख ठाकरे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून त्या पाचही जणांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.दंगलीचे पडसाद वाहतुकीवरसोयगाव आगारात दंगलीची बातमी स्थानकावर पसरताच सोयगाव बस स्थानकात सन्नाटा पसरला होता त्यामुळे एस टी च्या वाहतुकीवर पडसाद उमटले होते. याप्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीते,जमादार संतोष पाईकराव, सुभाष पाटील,रवींद्र तायडे, सागर गायकवाड आदी करत आहे