औरंगाबाद : खतांची साठेबाजी होत असल्याचा, तसेच चढ्या भावात विक्री होत असल्याचा प्रकार कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी स्वत: स्टिंंग आॅपरेशन करून उघडकीस आणला. यासाठी कृषिमंत्री चक्क शेतकऱ्याच्या वेशात गेले. येथील जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्समध्ये होत असलेल्या साठेबाजीचा प्रकार त्यांनी समोर आणला. या प्रकारामुळे औरंगाबादेत खतांची साठेबाजी करणा-या आणि चढ्या भावात बियाणे विकणाºया व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.जाधववाडीतील नवीनकुमार पाटणी यांच्या नवभारत फर्टिलायझर्ससह काही खते, बियाणे विक्रेत्यांबाबत शेतकºयांनी फोनवर दादा भुसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे रविवारी बीडला जाताना जाधववाडी येथील खतविक्री केंद्राची तपासणी केली. या दुकानात रासायनिक खते मिळत नसल्याच्या, तसेच युरिया जर पाहिजे असेल तर दुसरी खते व सोबत बियाणे विकत घ्यावे लागत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच चढ्या दराने खतांची विक्री होत असल्याच्याही तक्रारी होत्या. त्यावरून नवभारत फर्टिलायझर्स येथे दादा भुसे हे दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेतकºयाच्या वेशात एका शेतकºयासोबत दुचाकीवर गेले. दुकानात गेल्यावर कृषिमंत्र्यांनी दहा खताच्या गोण्या विनंतीपूर्वक मागितल्या. दुकानदाराने त्यांना नकार दिला. मग त्यांनी पाच गोण्या मागितल्या.विक्रेत्याने खत नसल्याचे सांगितले. मग बोर्डवर तर स्टॉक असल्याचे दिसत आहे, मग तुम्ही स्टॉक नाही असे का सांगत आहात, असा प्रश्न भुसे यांनी विचारला. शेतकºयाच्या वेशातील भुसे यांनी मग स्टॉकचे रजिस्टर मागितले. विक्रेत्याने रजिस्टर घरी असल्याचे सांगितले. ३०० रुपयांपेक्षा जास्त भावाने खत मिळेल, असेही विक्रेत्याने सांगितले. त्यावरून खतविक्रीत घोळ होत असल्याचे लक्षात येताच भुसे यांनी जिल्हा कृषी अधिकाºयांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि त्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.>१,३८६ खतांच्या गोण्यानवभारत फर्टिलायझर्सचे मालक पाटणी यांची सहा ते सात गोदामे तपासल्यानंतर १,३८६ गोण्या स्टॉकमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.सक्तीच्या रजेवरस्वत: कृषिमंत्र्यांना येऊन छापा टाकावा लागला. त्यामुळे जिल्हा कृषी यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी संशयाच्या भोवºयात आले आहेत. शेतकºयांच्या तक्रारी येताच गुण व नियंत्रक अधिकाºयाने दुकानाची तपासणी करणे गरजेचे होते; परंतु त्याने तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याला सक्तीच्या रजेवर पाठविले.>मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्याचा दौरा करीत आहे. आता बीडमध्ये जात आहे. आढावा बैठक ज्या दिवशी होती, त्याच दिवशी तक्रारीनुसार कारवाई करणार होतो; परंतु त्यादिवशी बैठक जालन्याला झाल्यामुळे काही करता आले नव्हते. आता ताफा लांबवर उभा करून शेतकºयाच्या वेशात खताची साठेबाजी चव्हाट्यावर आणली. - दादा भुसे, कृषिमंत्री, महाराष्ट्र
औरंगाबादेत खतांची साठेबाजी कृषिमंत्र्यांनी आणली चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 4:38 AM