शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

औरंगाबादेत सूर्य आग ओकतोय

By admin | Published: May 16, 2016 12:14 AM

औरंगाबाद : साधारणपणे मार्चपासूनच सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तापमान ४२ अंश सेल्शिअसपर्यंत गेले आहे.

औरंगाबाद : साधारणपणे मार्चपासूनच सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तापमान ४२ अंश सेल्शिअसपर्यंत गेले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाईनेदेखील गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मिळेल ते पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. परिणामी लहान बालकांबरोबर प्रौढ व्यक्तींनादेखील विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. एप्रिलमध्ये अंगणवाड्यांच्या माध्यमातून वजन घेण्यात आलेल्या बालकांपैकी जवळपास १४ हजार बालकांच्या वजनात कमालीची घट झाल्याचा खळबळजनक अहवाल समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या चालविल्या जातात. जिल्ह्यात ३ हजार १७८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये २ हजार ७०० मोठ्या अंगणवाड्या, तर ४७८ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांमध्ये नोंदणी केलेल्या बालकांची संख्या २ लाख ३६ हजार ६९२ एवढी असून, दरमहा या बालकांचे वजन केले जाते, तसेच अंगणवाड्यांमार्फत बालकांना पोषण आहार तसेच आरोग्य पूरक सुविधाही पुरविल्या जातात. याशिवाय अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुलींना आरोग्यविषयक सल्ला, आरोग्य तपासणी केली जाते. तापमानामुळे उड्डाणपूलही तापलावैशाखातील उन्हाचा तडाखा सर्व स्तरावर बसतो आहे. एमएसआरडीसीने बांधलेल्या महावीर चौकातील उड्डाणपुलालादेखील उन्हाचा फटका बसल्याचे ‘प्रूफ लोड टेस्ट’च्या पहिल्या दिवशी लक्षात आले. मुंबईतील व्हीजेटी या संस्थेने प्रकल्प व्यवस्थापन समितीमार्फत त्या उड्डाणपुलाचे तापमान आणि उच्च वजन क्षमता तपासण्यासाठी रविवारी दुपारी १२.१० मिनिटांनी सुरुवात केली. सोमवारी दुपारपर्यंत हे काम चालेल. डॉ.अभय बंबोले, गौरंग राऊत व टीमने पुलाच्यावर १५० टन वजन असलेले ट्रक उभे करून खाली डायल गेज, डिप्लिकेशन सेन्सरनुसार पुलाच्या क्षमतेच्या चाचणीचे नमुने संकलित केले. इंडियन रोड काँग्रेसच्या कोड नं. ५१ नुसार गुणवत्ता तपासणी करावी लागते. या तपासणीच्या प्रमाणपत्रानंतरच पूल वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, हे स्पष्ट होईल. त्यानंतर पूल वाहतुकीला खुला होईल. २४ तासांपर्यंत १५० टनाचे सहा ट्रक पुलाच्या ५० मीटर अंतराच्या मध्यभागी ठेवण्यात आले आहेत. एका ट्रकमध्ये २५ टन वजनाचे साहित्य होते.