लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. वीज गळतीचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नाही. कर्मचारी काम करीत नाहीत, असा कांगावा करत हे शहर पुन्हा एकदा खाजगी भांडवलदाराच्या घशात (फ्रँचायजी) घालण्याचे षडयंत्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांचे आहे, असा आरोप वीज तांत्रिक कामगार संघटनेने केला आहे.यासंदर्भात संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन ‘लोकमत’ प्रतिनिधीसोबत चर्चा करताना म्हणाले की, बुधवारी प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाच्या आवारात सभा घेतली. या सभेला श्रोते म्हणून औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतील सुमारे हजारो अभियंते, अधिकारी व जनमित्रांना सक्तीने बोलावण्यात आले होते. वीज गळती रोखणे आणि थकबाकीच्या वसुलीबाबत वरिष्ठ अधिकाºयांनी अभियंते- कामगारांना उपदेश करायचे होते. त्यांचे मनोबल उंचावण्याची गरज होती; पण तसे न करता औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी कर्मचाºयांना तुम्ही जर संघटनांकडे जाल, तर तुमची वाट लावली जाईल, अशा धमक्या दिल्या. ही बाब आम्ही मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या कानावर घालणार आहोत.दिवाळीनंतर ग्रामीण भागातून ३०० जनमित्र शहरात आणले व त्यांच्याकडे थकबाकी वसुलीची मोहीम सोपविण्यात आली. या जनमित्रांनी घरोघरी जाऊन थकबाकी वसूल तर केलीच, शिवाय १० ते १५ हजार पंचनामे केले. त्याचे पुढे काय झाले. मुख्य अभियंता किंवा अन्य यंत्रणेने थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची कोणती भूमिका घेतली. वसुलीचे काम बºयापैकी झालेले असतानाही, तरीही थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असा कांगावा केला जातो. हे शहर पुन्हा एकदा फ्रँचायजीकडे सोपवून कर्मचारी व सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचा यांचा छुपा अजेंडा आहे, असा आरोपही जहिरोद्दीन यांनी केला. काल दिवसभर १ हजार जनमित्र बसून ठेवले. त्यांना पिण्यासाठी पाणीदेखील दिले नाही. पाणी पिण्यासाठी जनमित्र हे विश्रामगृहात जात होते तेव्हा त्यांना सुरक्षारक्षकांनी जाऊ दिले नाही. व्यवस्थापनाची जर अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असेही ते म्हणाले.बोललो नाही, तर कामे कशी होतीलयासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, फ्रँचायजी इथे यावी, असे आम्हाला तरी वाटते का, वर्षभरापासून वीजगळती व थकबाकी वसुलीसाठी वेगवेगळ्या मोहिमा राबविल्या; पण अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे आम्ही काल वीज कर्मचारी, अभियंत्यांचा प्रादेशिक संचालकांच्या उपस्थितीत मेळावा घेतला होता. अपेक्षित वसुली झाली असती, वीजगळती कमी झाली असती, तर आम्हाला बोलण्याची गरजच नव्हती. आम्ही जर बोललोच नाही, रागावलो नाही, तर कामे कशी होतील. थोडेफार तर रागावलेच पाहिजे ना. फिल्डवर जेव्हा मला जाण्याची वेळ येते. जेव्हा वरिष्ठांकडून थकबाकी आणि वीजगळतीबाबत बोलणे खावे लागत असेल, तर मी काय करू. सातारा परिसरात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेला अहवाल जनमित्रांनी दिला. मी जेव्हा तेथे गेलो तर तीन ठिकाणी वीजपुरवठा सुरूअसल्याचे दिसले. जनमित्रांना प्रत्येक घराची माहिती असते. मग, त्यांना सांगितल्यानंतरही ते कठोर भूमिका का घेत नाहीत.चालू आर्थिक वर्षात अपेक्षित होती ५६ कोटी रुपयांची वसुलीगणेशकर म्हणाले,मार्च २०१७ पूर्वी १८० कोटी रुपयांची थकबाकी होती. ती आता ८० कोटींवर आली. याचा अर्थ १०० कोटी रुपयांची वसुली केली असा नव्हे. १०० कोटी रुपयांच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. तो पैसा खात्यात जमा झालेला नाही.एप्रिलपासून शहरात २६ कोटी आणि ग्रामीणचे २३ कोटी असे मिळून सुमारे ५६ कोटी रुपये वसूल करण्याची गरज आहे. आतापर्यंत ती झालेली नाही. आता केवळ दीड महिन्याचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे कर्मचाºयांच्या पाठीमागे लागावे लागणारच आहे.वीज गळतीचे प्रमाण ४०-४१ टक्क्यांवरून ३७-३८ टक्क्यांवर आले आहे. ही समाधानकारक परिस्थिती नाही. तरीही ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही त्यांच्यावर रागावलोही, तरी अभियंते- जनमित्र आमचेच आहेत. आम्ही एका परिवारातील आहोत. त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, हीच इच्छा आहे, असे गणेशकर म्हणाले.
औरंगाबाद :फ्रँचायजीसाठी यंत्रणेचा आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:09 AM
शहरात मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. वीज गळतीचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नाही. कर्मचारी काम करीत नाहीत, असा कांगावा करत हे शहर पुन्हा एकदा खाजगी भांडवलदाराच्या घशात (फ्रँचायजी) घालण्याचे षडयंत्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांचे आहे, असा आरोप वीज तांत्रिक कामगार संघटनेने केला आहे.
ठळक मुद्देमहावितरणविरूद्ध संघटना आक्रमक : वसुली, देखभाल दुरुस्ती, गळती रोखण्याकडे दुर्लक्ष