औरंगाबाद : शहरात आॅक्टोबर हिटचा चांगलाच तडाखा जाणवत असून, तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसकडे सरकत आहे. शहरात रविवारी ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.पावसाने पाठ फिरविल्याने शहराच्या तापमानात यंदा सप्टेंबरमध्येच नागरिकांना आॅक्टोबर हिट अनुभवावी लागली. शहरातील तापमान सप्टेंबरच्या पंधरवड्यात ३२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यानंतर तापमानाने ३४ अंश सेल्सिअसचा टप्पाही पार केला. परतीच्या पावसाने तापमानातील उकाडा कमी होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे; परंतु परतीच्या पावसाची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्याला सुरुवात झाल्यापासून शहरात चांगलाच उकाडा जाणवत आहे.आॅक्टोबर हिटमुळे शहरवासीय त्रस्त होत आहे. शहरात सकाळपासूनच चांगलेच ऊन चटकत असून, दुपारच्या वेळी उन्हाळ्याप्रमाणे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. चिकलठाणा वेधशाळेत रविवारी शहराचे तापमान ३४.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. सुटीच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यास प्राधान्य दिले. घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल, स्कार्फ बांधून आणि टोपी घालताना नागरिक पाहायला मिळाले. परतीच्या पावसाअभावी आगामी काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
औरंगाबादचा तापमानाचा पारा ३५ अंशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 11:50 PM
औरंगाबाद : शहरात आॅक्टोबर हिटचा चांगलाच तडाखा जाणवत असून, तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसकडे सरकत आहे. शहरात रविवारी ३४.८ ...
ठळक मुद्देआॅक्टोबर हिट : शहरात रविवारी ३४.८ तापमानाची नोंद