औरंगाबाद : शहरातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी उपलब्ध जागेचा आकडा दोन हजारांनी वाढला आहे. अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणीला सुरुवात झाली तेव्हा ११२ महाविद्यालयांमध्ये २९ हजार ८४५ जागा शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केल्या होत्या. मात्र मंगळवारी उपलब्ध जागांची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. यात उपलब्ध जागांचा आकडा ३३ हजार ३८८ वर पोहोचला आहे. या जागांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित आणि बायफोकल जागांचा समावेश आहे. शहराच्या हद्दीत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार ३९२ एवढी आहे.
अकरावीत प्रवेश घेण्यासाठी १ जूनपासूनच विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन नोंदणीला सुरुवात झाली होती. यात १२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना भाग-१ च भरण्यास उपलब्ध होता. यानंतर १३ जूनपासून भाग-२ उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिक्षण उपसंचालक विभागाने सुरुवातीला उपलब्ध जागांची संभाव्य संख्या जाहीर केली होती. यात काही नवीन तुकड्यांना, महाविद्यालयांना मान्यता मिळाल्यामुळे तीन हजारांपेक्षा अधिक जागा वाढल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार नसल्याचे चित्र आहे.
बायफोकलची आज गुणवत्ता यादी अकरावीमध्ये इलेक्ट्रॉनिकसह इतर तांत्रिक विषय असलेल्या बायफोकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (दि.२१) जाहीर होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका २२ जून रोजी मिळणार आहेत. त्यापूर्वी लागणाऱ्या यादीमुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन गुणपत्रिकांच्या आधारे तात्पुरते प्रवेश घ्यावे लागणार आहेत. मूळ गुणपत्रिका आणि टीसी दाखल केल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक खांडके यांनी दिली.
१९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणीअकरावीत प्रवेश घेण्यासाठी १९,१२९ विद्यार्थ्यांनी बुधवारपर्यंत सायंकाळी आॅनलाईन नोंदणी केली होती. ही आॅनलाईन नोंदणी २५ जूनच्या ५ वाजेपर्यंत करता येईल. त्यानंतर २९ जून रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाणार आहे.
११२ महाविद्यालयांत उपलब्ध जागांची संख्याशाखा अनुदानित विनाअनुदानित कायम स्वयंअर्थसाहाय्यित बायफोकल एकूण विनाअनुदानितकला ४,८९५ २,१६० १६० ९२० १० ८,१४५वाणिज्य २,१८५ १,१६० ०० १,१३० ३८० ४,८५५विज्ञान ४,८०० ४,५६० १,०८० ३,२१० ४,२६३ १७,९१३एमसीव्हीसी १,६९० ५७५ २१० ०० ०० २,४७५एकूण १३,५७० ८,४५५ १,४५० ५,२६० ४,६५३ ३३,३८८