शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

औरंगाबादेत कडकडाटासह बरसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:41 AM

शहर आणि परिसरात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उरात धडकी भरवणाऱ्या विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.

ठळक मुद्देजोरदार वृष्टी : शहरातील अनेक भागांतील घरांत पाणी; जिल्ह्यातही पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर आणि परिसरात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उरात धडकी भरवणाऱ्या विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. तासभर बरसलेल्या या पावसाने हुसेन कॉलनी, समतानगर, एन-७ सिडकोसह इतर भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. चिकलठाणा वेधशाळेत रात्री ११.३0 वाजता ४७.४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.शहरातील काही भागांमध्ये गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळपर्यंत अधून मधून पावसाची भुरभुर सुरू होती. काही तासांसाठी खंड पडल्यानंतर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पावसाला पुन्हा सुरुवात झाली. रात्री १० वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाचा जोर चांगलाच वाढला. याचवेळी उरात धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता.पाऊस कोसळत असताना अधून मधून विजेचा जोरदार कडकडाट होत होता. पावसाच्या जोरदार धारांमुळे विविध भाग आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. निराला बाजार येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्स, एन-७ सिडको आणि समतानगरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या ठिकाणी मदतीसाठी अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. पावसामुळे विशेषकरून जयभवानीनगरमधील नागरिकांमध्ये रात्री भीतीचे वातावरण होते. अतिक्रमणामुळे अरुंद नाल्यांतील पाणी घरांत येण्याची भीती होती.ग्रामीण भागात काही परिसरात पाऊसगुरुवारी सायंकाळी व रात्री जिल्ह्यातील काही भागांतच पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.पाचोड, आडूळ, लासूर स्टेशन, शिल्लेगाव, विहामांडवा, वासडी, चिकलठाण, सोयगाव, लिंबेजळगाव, पिशोर, फर्दापूर, अंभई, नागद, पळशी, हतनूर, दुधड, केºहाळा, नेवरगाव, बिडकीन, नीलजगाव, लाडसावंगी, ढोरकीन, सुंदरवाडी, कन्नड व परिसरात कमी-अधिक प्रमाणात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याचे वृत्त आहे.काही भागात रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली.वीज कोसळून २ बैल ठारबिडकीनपासून जवळच असलेल्या निलजगाव तांडा येथे वीज कोसळून दोन बैल ठार झाले. येथील शेतकरी नानू रावजी राठोड यांनी गोठ्यात बैल बांधले होते. पेरणीची लगबग सुरू असताना बैलांचा वीज पडून मृत्यू झाल्यामुळे शेतकºयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल अधिकारी व पोउनि. बलभीम राऊत आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर शेतकºयाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद