औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना शुक्रवारपासून (दि.१०) सुुरुवात होत आहे. या परीक्षेला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तब्बल ३ लाख ५ हजार ४९४ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचा शुभारंभ ढिसाळ नियोजनाने झाला. परीक्षा केंद्रांचे योग्य नियोजन झाले नसल्यामुळे ऐनवेळी २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आली असून, युद्धपातळीवर हॉलतिकीटमध्ये बदल केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.
विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी किमान दोन महिन्यांपासून नियोजन करण्याची आवश्यकता असते. मात्र परीक्षा संचालकांच्या राजीनाम्यामुळे योग्य पद्धतीने परीक्षा केंद्रांचे वाटप करण्यात आले नाही. चार दिवसांपूर्वी परीक्षा संचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर परीक्षाा केंद्रांचा आढावा घेताना ज्या महाविद्यालयामध्ये परीक्षार्थी बसण्यासही जागा उपलब्ध नाही. अशा महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त विद्यार्थी देण्यात आले होते. तर ज्याठिकाणी सर्व सुविधा आहेत. त्या ठिकाणी अल्प प्रमाणात विद्यार्थी देण्यात आले. याचा परीणाम ऐनवेळी परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करावी लागली आहे. यामुळे तब्बल २१ परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती परीक्षा संचालक डॉ. नेटके यांनी दिली.मिलिंद कला महाविद्यालयात जास्तीत जास्त ६०० ते ७०० विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. परंतु त्यांच्याकडे २३ विद्यार्थी देण्यात आले होते. याचा परिणाम तेथील प्राचार्यांनी परीक्षार्थींना बसण्यासाठी परीक्षा हॉलच उपलब्ध नसतील तर परीक्षा कशी घ्यायची? असा सवाल उपस्थित केल्यामुळे ऐनवेळी अनेक ठिकाणी बदल केले आहेत. या बदलामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट बदलले आहेत. हे बदलले हॉलतिकिट संंबंधित विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयात पाठविण्यात आले असून, आॅनलाईनसूद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे पाठवली असून, तरीही आपत्कालिन व्यवस्था म्हणून महाविद्यालयांना अंडरटेकिंग लिहून घेत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे डॉ. नेटके म्हणाले.
...तर फर्निचर भाड्याने घ्याज्या महाविद्यालयामध्ये परीक्षार्थी अतिरिक्त झाले असून, त्याठिकाणचे अतिरिक्त विद्यार्थी इतर ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा परिणामही परीक्षा केंद्रावर झाला असल्यामुळे महाविद्यालयांना परीक्षेसाठी फर्निचार भाड्याने घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे डॉ. नेटके म्हणाले.
२१ परीक्षा केंद्रांमध्ये बदलविद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया पदवी परीक्षांच्या केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. विद्यार्थी संख्या अतिरिक्त होत असल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रामध्ये बदल केला आहे. या संबंधित अपडेट माहिती संबंधित महाविद्यालये, विद्यापीठाची वेबसाईट आणि परीक्षा केंद्रांवर देण्यात आली आहे. याशिवाय बदल केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती सूद्धा एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांना पाठवली असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले.
२२४ केंद्रांवर होणार परीक्षाविद्यापीठाच्या पदवी परीक्षा तब्बल २२४ केंद्रांवर होणार आहेत. यात औरंगाबद शहरात ३२, औरंगाबाद ग्रामीणमध्ये ४८, जालना शहर १२, जालना ग्रामीण ३४, बीड शहर १०, बीड ग्रामीण ५१, उस्मानाबाद शहर ९ आणि उस्मानाबाद ग्रामीणमध्ये २८ परीक्षा केंद्र असणार आहेत. या परीक्षात कॉपीमुक्तसाठी १६ भरारी पथके, २२४ सहकेंद्र प्रमख नेमण्यात आले आहेत.
अशी असणार परीक्षार्थींची संख्याअभ्यासक्रम विद्यार्थी
बी.ए. १,०९,०६१
बी.एस्सी १,०८,३१६
बी. कॉम. ५८,३३५
बीसीएसव इतर २९,७८२
--------------------------
एकुण ३,०५,४९४
पुर्वी असलेल्या परीक्षा संचालकांनी परीक्षेची तयारीच केली नव्हती. माझ्याकडे चार दिवसांपूर्वी पदभार देण्यात आला आहे. पहिल्या नियोजनात थोडी गडबड होती. ती दुरुस्त केली आहे. पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांची त्रास होऊ शकतो. मात्र हा त्रास होऊ नये, यासाठी सर्व परीक्षा केंद्रांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा संचालक