औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत महाविद्यालयीन प्राध्यापक संवर्गात बामुक्टो संघटनेतर्फे निवडणूकीला उभे राहिलेले डॉ. शरफोद्दीन (शफी) शेख यांच्या विरोधात प्राचार्यांनी खोटी सही केल्याचा आरोप करत बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन बदनापूर पोलीस बामुक्टोच्या उमेदवराला मानसिक त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोप बामुक्टोचे उमेदवार डॉ. विक्रम खिलारे यांनी केला आहे.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत बामुक्टो संघटनेतर्फे स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. यात प्राध्यापक गटात बदनापूर येथील निर्मल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शफी शेख हे खुल्या प्रवर्गातुन निवडणूक लढवत आहेत. नामांकन दाखल करताना अर्जावर प्राचार्याची सही व शिक्का असणे आवश्यक होते. नामांकन दाखल करण्याच्या कार्यकाळात डॉ. शेख यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या महाविद्यालयात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे डॉ. शेख यांनी उपप्राचार्य डॉ. उंडेगावकर यांची सही व शिक्का घेत नामांकन दाखल केले. मात्र प्राचाार्या महाविद्यालयात येताच त्यांना याची माहिती झाल्यानंतर त्यांनी विद्यापीठाकडे अर्ज दाखल करत नामांकन रद्द करण्याची मागणी केली. यानंतर त्यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे सादर केली असल्याची तक्रार दाखल केली.
या तक्रारीवर दहा दिवस संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाºयांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र मतदान दोन दिवसांवर आले असतानाच पोलीस अधिकाºयांने डॉ. शफी शेख यांना दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. हे चुकीचे आहे. डॉ. शफी शेख यांनी सादर केलेली कागदपत्रे बोगस किंवा बनावट नसून, अधिकृत उपप्राचार्यांची सही आणि शिक्का घेतलेला आहे. तरीही मानसिक त्रास देण्याच्या हेतूने बामुक्टोच्या उमेदवाराला काही लोकांच्या सांगण्यावरून प्राचार्या त्रास देत असल्याचा आरोप बामुक्टोचे पदाधिकारी व उमेदवार डॉ. विक्रम खिलारे यांनी केला आहे. संघटना डॉ.शेख यांच्या पाठिंशी असून, या दडपशाहीच्या विरोधात लढा उभारणार असल्याचेही डॉ. खिलारे यांनी सांगितले.
पोलिसात खोटी तक्रारमी कोणतीही चूक केलेली नाही. जाणिवपूर्वक पोलिसात खोटी तक्रार दिली. हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. - डॉ. शफी शेख, उमेदवार बामुक्टो
पोलिसच अधिक तपास करतील.माझ्या महाविद्यालयातील एका प्राध्यापकांने बोगस लेटरपॅडचा वापर केल्याचे निर्दशनास आले आहे. यावरुन पोलिसात तक्रार दाखल केली. आता त्याविषयी पोलिसच अधिक तपास करतील.- डॉ.एम.डी. पाथ्रीकर, प्राचार्या, निर्मल महाविद्यालय, बदनापूर