औरंगाबाद : पोलिसांची परवानगी नाकारून निघालेला शिवसेनेचा निषेध मोर्चा काही अंतरावर जाताच पोलिसांनी अडवला. यानंतर पोलिसांनी सर्व मोर्चेकऱ्यांना प्रतीबंधानात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वाना एस.बी. महाविद्यालयाच्या मैदानात आणून सोडून देण्यात आले.
११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज दुपारी पैठण गेट येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काही अंतरावर जाताच पोलिसांनी मोर्चास अडवले. पैठण गेट ते एस.बी. महाविद्यालयांपर्यंत सर्व मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर सर्वाना महाविद्यालयाच्या मैदानात आणून सोडून देण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कोडे यांनी दिली.
दरम्यान, शिवसेनेचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पोहचले असून त्यांची आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी चर्चा सुरु आहे.