शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

औरंगाबादला पावसाने जोरदार धुतले; १२५ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 6:30 PM

तब्बल अठरा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या श्रावणसरींनी गुरुवारी (दि. १६) औरंगाबाद शहरातसह संपूर्ण जिल्हा चिंब भिजून निघाला.  

औरंगाबाद : तब्बल अठरा तासांपेक्षा अधिक काळ सतत कोसळलेल्या श्रावणसरींनी गुरुवारी (दि. १६) औरंगाबाद शहरातसह संपूर्ण जिल्हा चिंब भिजून निघाला.  पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत असले तरी या काळात अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. अनेकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले तरी पावसाचे आगमन मात्र झाले नाही. 

सोमवारपासून श्रावण मास सुरू झाला आणि वातावरणात झपाट्याने बदल होत गेले. शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासूनच संततधार सुरू झाली. अधूनमधून मुसळधार पाऊसही कोसळत राहिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकण्याची चिन्हे दिसत असतानाच संततधार व अधूनमधून कोसळलेल्या जोरदार सरींनी पिकांना जीवदान मिळाल्याचे बोलले जात आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच श्रावणात एका दिवसांत १२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. १६ आॅगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत १०३ मि.मी. पावसाची दमदार नोंद झाल्यानंतर रात्री ११.३० वाजेपर्यंतच्या तीन तासांत अंदाजे २२ मि.मी.हून अधिक पाऊस बरसल्याचे चिकलठाणा वेधशाळेकडून सांगण्यात आले. 

शासकीय आकडेवारीनुसार ६५ मि.मी.च्या पुढे पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरण्यात येते. शहर व परिसरात १२५ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे अतिवृष्टीच्या पुढे पाऊस गेल्याने दिवसभर नागरिकांची तारांबळ उडाली. जनजीवनावर पावसामुळे मोठा परिणाम झाला. रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी होते. शाळा, महाविद्यालयांच्या उपस्थितीवरदेखील पावसाने परिणाम केला. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही, पावसाच्या दमदार सरींमुळे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. नाले दुथडी भरून वाहिले, तर काही भागातील घरांमध्ये पाणी शिरले. 

शहरात १७ जुलै रोजी ४९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी म्हणजेच तब्बल महिनाभरानंतर दमदार पावसाच्या सरी बसरल्या आहेत. मागील काही वर्षांत आॅगस्ट महिन्यांत आजच्याप्रमाणे पावसाच्या सरी बरसल्या नव्हत्या. शहर व ग्रामीण मिळून ६७५ मि.मी. पावसाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी १८२ मि.मी. इतका पाऊस झाला असून ते २७ टक्के प्रमाण आहे. ३८५ मि.मी. एवढा पाऊस होणे अपेक्षित होते. ५० टक्के पावसाचा खंड पडला असून, गुरुवारच्या पावसामुळे किती प्रमाणात सरासरी वाढली हे शुक्रवारी सकाळच्या नोंदीनुसार समोर येईल. 

तीन ठिकाणी झाडे पडलीटाऊन सेंटर एन-१, एन-४ एमआयटी हॉस्पिटल, एन-१३ येथे पावसामुळे झाडे उन्मळून पडली, तर रोपळेकर चौकातील दुकानात पाणी शिरले. घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद अग्निशमन विभागाकडे नव्हती. जयभवानीनगर, किराडपुरा, भवानीनगर, पुंडलिकनगर, ईटखेडा, उल्कानगरी, कटकटगेट, एन-३, एन-४, स्वप्ननगरी, फाजलपुरा, हर्षनगर या परिसरातील नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

बाजारपेठ ठप्प पावसामुळे बाजारपेठेत अनेक दुकानांचे शटर उघडलेच नाही. जी दुकाने उघडली तेथे ग्राहकी नसल्याचे दिसून आले. मोंढ्यातही हीच परिस्थिती होती. ग्राहकी नसल्याने व्यापारीवर्ग टीव्हीवर बातम्या बघताना दिसून आले. मोंढ्यात काही हमाल, लोडिंग रिक्षावाले आले होते; पण पावसामुळे ग्राहकच येत नसल्याने त्यांनी दुपारनंतर घर गाठले. 

जालना रोड उखडलाशहराचा मुख्य रस्ता जालना रोड दिवसभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी उखडला. सेव्हन हिल ते सिडको उड्डाणपुलालगत रस्त्यावर खड्डे पडले. तसेच मोंढानाका पुलालगतचा भागही चिखलमय झाला. क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. 

आठवडी बाजारात भाज्या विक्रीविना पडूनसंततधारेमुळे जाधववाडीत गुरुवारी  शेतकऱ्यांनी शेतीमाल कमी आणला. त्यात  ग्राहकांनीही पाठ फिरविल्याने बहुतांश भाजीपाला विक्रीविना पडून राहिला. अडत व्यापारी इसाखान यांनी सांगितले की, पालेभाज्या कमी प्रमाणात आल्या होत्या; पण पावसामुळे ग्राहकच आले नाहीत. दुकाने उघडी होती; पण शुकशुकाट होता. अडत व्यापारी मुजीबसेठ म्हणाले की, सिल्लोड परिसरातून मोठ्या प्रमाणात लवंगी मिरचीची आवक होते. मात्र, पावसामुळे शेतकरी, मजूर शेतात मिरची तोडण्यासाठी गेलेच नाही. तसेच अन्य फळभाज्या, पालेभाज्यांची हीच परिस्थिती होती. परिणामी, नेहमीपेक्षा अवघ्या २० ते ३० टक्केच आवक झाली. ग्राहकी नसल्याने माल पडून राहिला.  शुक्रवारी अडत बाजाराला साप्ताहिक सुटी असते. असेच दोन ते तीन दिवस संततधार पाऊस राहिला तर भाज्यांचे भाव वाढतील.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका