शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पत्नी पीडितांनी संन्यासी वेशभूषेत काढली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 6:35 PM

जागतिक पुरुष हक्क दिनानिमित्त पत्नी पीडित पुरुष आश्रमातर्फे क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत संन्यासी वेशभूषेत पायी दिंडी काढण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्ह्यात स्वतंत्र पुरुष तक्रार केंद्र स्थापन करण्याची मागणी

औरंगाबाद : जागतिक पुरुष हक्क दिनानिमित्त पत्नी पीडित पुरुष आश्रमातर्फे क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत संन्यासी वेशभूषेत पायी दिंडी काढण्यात आली होती. या अनोख्या आंदोलनाने क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंतच्या मार्गावरील सर्व नागरिकांचे लक्ष वेधले होते. पुरुषांवरील वाढत्या अत्याचारामुळे बहुतांश पत्नी पीडितांसमोर आत्महत्या, तुरुंगवास अथवा संन्यास हेच पर्याय दिसतात. त्यापैकी संन्यास घेणेच योग्य वाटू लागले आहे, त्यामुळे संघटनेने पुरुष हक्क दिन ‘संन्यास दिन’ म्हणून पाळून पायी दिंडी काढल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात स्वतंत्ररीत्या पुरुष तक्रार केंद्र स्थापन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेने विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, १९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष हक्क दिन आहे. ३० देशांमध्ये हा दिन साजरा केला जातो. स्त्री सशक्तीकरणाची जाणीव व्हावी म्हणून महिला दिन साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे पुरुषांमध्ये देखील जागरूकता व्हावी, पुरुषांना समाजात मानाचे स्थान मिळावे. पुरुषावर पत्नीकडून होणाऱ्या छळात वाढ होत आहे.

यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. होतकरू स्त्री-पुरुषांचे नुकसान होत आहे. महिलांसाठी वेगवेगळे कायदे प्रचलित असून, पुरुषांच्या बाजूने कायद्यांचा आधार अत्यल्प आहे. पुरुष खचून अखेरीस आत्महत्येकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे. या अनोख्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे, प्रमोद तरवटे, प्रवीण गाले, संजय नरवडे, चरणसिंग दुसिंगे, विशाल नांदरकर आदींनी सहभाग नोंदविला. 

पत्नी पीडितांच्या मागण्या अशापुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करावा. घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे संरक्षण अधिनियम लागू करावा. वाढत्या लिंग भेदाला आवर घालावा. कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यास एक वर्षात निकाल लागावा. प्रत्येक पोलीस ठाण्यात लायडिटेक्टरची सक्ती करावी. पोटगी भरण्यास असमर्थ असणाऱ्या व्यक्तीस जेलमध्ये न पाठविता शासकीय नोकरीत समाविष्ट करावे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पुरुष हक्क दिन साजरा करण्यात यावा. 

टॅग्स :agitationआंदोलनkranti chowkक्रांती चौकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद