औरंगाबाद : हताश आणि हतबल झालेल्या महापालिकेला ३४ व्या दिवशीही कचºयाच्या विल्हेवाटीवर ठोस असा उपाय शोधता आलेला नाही. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी नेमून दिलेल्या पंचसूत्रीनुसार ९ झोनमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्याच्या सूचना होत्या. त्यापैकी ५ झोनमध्ये प्रक्रियेसाठी जागा उपलब्ध नाही.
वॉर्डातील कचरा वॉर्डातच प्रक्रिया करण्यासाठी ७७ ठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्याचा दावा पालिकेने गुरुवारी केला आहे. कुठे काय चालले आहे हे कळण्यास मार्ग नाही. विभागीय आयुक्तांनी ९ मार्चनंतर या प्रकरणात लक्ष घालण्यास कमी केले आहे. जिल्हाधिकाºयांवर प्रभारी मनपा आयुक्तांची जबाबदारी दिल्यामुळे ते जागेचा शोध घेत आहेत. दरम्यान, वॉर्डातील कचरा वॉर्डातच प्रक्रिया करण्याचा नवा फंडा पालिकेने आज जाहीर केला आहे.प्रक्रिया करण्यासाठी शोधल्या जागा
झोन नं.१: साई ग्राऊंड, कत्तलखाना, बेगमपुरा स्मशानभूमी, गुलाबवाडी, आरेफ कॉलनी, सिद्धार्थ गार्डन, नेहरूभवन.झोन नं.२ : झोनच्या मागे, औरंगपुरा भाजीमंडई, शहागंज जुने बसस्टॅण्ड, शनिमंदिर जवळील मनपाची जागा, म्हाडा कॉलनी मनपाचे मैदान, शहागंज भाजीमंडई, जिन्सी मनपा शाळा, नवाबपुरा दवाखान्याच्या बाजूला.झोन नं.३ : शहाबाजार कचराकुंडीजवळ, मजनूहिल, एस.टी.कॉलनी नाल्यावर, दूरदर्शन केंद्रालगत, मनपा शाळेसमोर, पाणीबंबाजवळ, रोशनगेट कापूस गिरणीलगत, अनिसा शाळेचे मैदान, नागसेन कॉलनी मोकळी जागा, बसय्यैनगर, परमवीर हॉल, एमजीएम रोडलगतची मोकळी जागा, झोन नं.३ मधील जागा.झोन नं.४: एन-११ भाजीमंडई, एन-१२ सत्यविष्णू हॉस्पिटल एसटीपी, एन- ९ फरशी मैदान, एन-१३ कारागृहासमोरचे मैदान, सावंगी जकात नाका, जांभूळवन परिसर, सुभेदारी गेस्ट हाऊससमोरील जागा, गरवारे स्टेडियमच्या बाजूला.झोन नं.५: चौधरी कॉलनी कमानशेजारी, सेंट झेवियर्स शाळेजवळ, रामलीला मैदान मनपा जागा, बॉटनिकल गार्डन, मनपा शाळेच्या बाजूला, तेरणा शिक्षण संस्थेजवळ, राहुल हॉलमागे.झोन नं.६: सोहम मोटार्स मागे, विमानतळ भिंतीलगत, जैन मंदिराजवळ, स्मशानभूमी, विमानतळ, ज्ञानेश विद्या मंदिराजवळ.झोन नं.७ : बायजीपुरा मनपाची जागा, पुंडलिकनगर जलकुंभ परिसर, वॉर्डातील रोडलगत, सूतगिरणी परिसर, संतसृष्टी मैदान, रोपळेकर हॉस्पिटल मागे, फोस्टर कॉलेज मागे, पंडित नेहरू कॉलेज मागे, शास्त्रीनगर.झोन नं. ८: गारखेडा शाळा, कांचनवाडी एसटीपीजवळ, दिशा संस्कृतीजवळ, रेल्वेस्टेशन मालधक्का, सावरकर उद्यान, भाजी मार्के ट परिसर, स्मशानभूमीलगत, छत्रपती क्रीडा संकुलालगत, एसआरपी कॅम्प.झोन नं.९: कैलासनगर, रमानगर, स्मशानभूमी, चेतना हाऊसिंग सो., भगीरथ कॉलनी झेडपी मागे, मनपा उद्यान, टिळकनगर नाल्यालगत, भांडारबावडी, तरुण भारत मागे, संजय हाऊसिंग सोसायटी.