शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

औरंगाबादच्या तरुणाचा राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज; मतांसाठी केजरीवाल, शिंदेंना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 6:12 PM

यापूर्वी त्याने नगरसेवक, पदवीधर मतदारसंघ, लोकसभा निवडणूक लढवली आहे, आता थेट राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

औरंगाबाद: शहरातील सिडको भागात राहणाऱ्या एका तरुणाने चक्क राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल उद्धव नांदरकर असे या तरुणाचे नाव आहे. सामाजिक कार्यात सक्रीय असलेला विशालच्या उमेदवारी अर्ज दाखल केलायची पावती सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. विशाल सध्या दिल्ली येथेच असून मतांसाठी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहे. दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मत देण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती त्याने दिली आहे.  

देशातील सर्वौच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज कोण दाखल करतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. राजकीयदृष्ट्या महत्वाचे असलेले या पदासाठी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा आघाडीने आणि विरोधकांनी मतांचे गणित मांडत आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथील विशाल नांदरकर या तरुणाने देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थेट राष्ट्रपती भवन गाठत विशालने राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती विशालने दिली. तसेच देशातील सर्व पक्ष, लोकप्रतिनिधींना मत देण्याचे आवाहन त्याने केले आहे. 

अनुमोदकांची नावे गुपित उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. तसेच अर्जावर ५० लोकप्रतिनिधींच्या सह्या अनुमोदक म्हणून आवश्यक असतात. ५० लोकप्रतिनिधींच्या सह्या घेऊन अर्ज दाखल केला आहे. त्या अनुमोदकांची नावे गुप्त आहेत असे विशालने सांगितले. तसेच छाननीमध्ये माझा अर्ज वैध ठरेल,असा विश्वास देखील विशालने व्यक्त केला आहे. त्यामुळे विशालचा अर्ज बाद होतो की निवडणुकीच्या रिंगणात राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे. 

मतांसाठी एकनाथ शिंदे, केजरीवालांना भेटणारअर्ज दाखल केल्यापासून विशाल दिल्ली येथे आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी विशालने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटून आप पक्षाचे मते देण्याची विनंती करणार असल्याचे विशाल म्हणाला. तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची गुवाहाटी येथे भेट घेऊन त्यांच्या गटाचे मत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्याने सांगितले. 

नगरसेवक ते राष्ट्रपती, सर्वच निवडणुकीत अर्ज विशाल हा शहरात विविध सामाजिक कार्यात सक्रीय असतो. त्याने आतापर्यंत महापालिका निवडणू गुलमंडी वॉर्ड येथून लढवली आहे. तसेच विधानसभा, लोकसभा आणि पदवीधर निवडणुका देखील त्याने लढवल्या आहेत. राष्ट्रपतीपदाची मागील निवडणूक वय पूर्ण होत नसल्याने लढता आली अशी खंत विशालने व्यक्त केली. 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेArvind Kejriwalअरविंद केजरीवाल